Fraud Case Saam tv
महाराष्ट्र

Fraud Case : २० लाखांचा नफा देत घडविला दुबई दौरा; गुंतवणुकीच्या आमिषातून ६६ लाख रुपयात फसवणूक

Jalgaon News : कॅफे चालक याने ओळख काढत आम्ही कंपनीचे अधिकृत वितरक असून तुम्ही सुद्धा हा व्यवसाय करा, असे सांगून गुंतवणूक करण्यास सांगितले. तसेच त्यातून मिळणाऱ्या नफ्याचीही माहिती दिली

संजय महाजन

जळगाव : आमिष देत फसवणूक करण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. अशातच जळगावातील एका महिलेची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. गुंतवणूक करण्याचे सांगून सुरुवातीला २० लाख २४ हजार ९९४ रुपयांचा नफा देण्यासह दुबई दौरा घडविला. मात्र नंतर उकळलेली रक्कम परत न देता सदर महिलेची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अहिल्यानगर येथे राहणाऱ्या चांदोरीकर यांचे माहेर जळगावचे आहे. त्या मे २०२३ मध्ये पतीसह माहेरी आल्या होत्या. यावेळी ते दोघे व महिलेचा मामेभाऊ हे एका कॅफेमध्ये अल्पोपहार करण्यासाठी गेले होते. याठिकाणी कॅफे चालक याने ओळख काढत आम्ही कंपनीचे अधिकृत वितरक असून तुम्ही सुद्धा हा व्यवसाय करा, असे सांगून गुंतवणूक करण्यास सांगितले. तसेच त्यातून मिळणाऱ्या नफ्याचीही माहिती दिली. 

सुरवातीला दिला नफा 

कॅफे चालकाने सांगितल्यावर विश्वास ठेवत महिलेने लाईफ कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सदर इसमास रक्कम दिली. त्यानुसार महिलेने केलेल्या गुंतवणुकीवर समोरच्याने सुरवातीला २० लाख २५ हजार रुपयांचा नफा दिला. इतकेच नाही तर कंपनीमार्फत दुबई दौरा घडवून आणला होता. यामुळे महिलेचा विश्वास अधिक पक्का झाला. मात्र कालांतराने गुंतवणुकीची रक्कम नंतर मिळाली नाही.  

फसवणुक प्रकरणी गुन्हा दाखल 

दरम्यान वारंवार रक्कमेची मागणी केल्यानंतर देखील महिलेला रक्कम देण्यास टाळाटाळ केली. यामुळे लाईफ कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून महिलेची ६६ लाख ४० हजार रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फसवणूक केल्याप्रकरणी दोन भाऊ, त्यांचे आई- वडील व कंपनीच्या एका कर्मचाऱ्याविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

Maharashtra Live News Update: सोलापुरात नोकरी न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

MNS Warns Sushil Kedia : ५ तारखेनंतर काय करायचं ते करू; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या केडियांना मनसेचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT