Jalgaon ZP
Jalgaon ZP Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon: जिल्‍हा परिषदेचे वाढले दहा गट

साम टिव्ही ब्युरो

जळगाव :आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्‍या निवडणूकांच्‍या तयारीच्‍या दृष्‍टीने जिल्‍हा परिषद गट व पंचायत समितीच्‍या गणांची रचना जिल्‍हा प्रशासनाने जाहीर केली आहे. यापुर्वीच जाहीर झाल्‍याप्रमाणे (Zilha Parishad) जिल्‍हा परिषदेचे दहा गट व २० गण वाढले आहेत. या जाहीर रचनेवर ८ जूनपर्यंत हरकती मागविण्यात आल्‍या आहेत. (jalgaon news Increased ten groups of Zilla Parishad)

जळगाव (Jalgaon) जिल्हयातील जिल्हा परिषद व त्या अंतर्गत येणार्‍या पंचायत समिती निवडणुक २०२२ अंतर्गत ७७ गट व १५४ गण यांची प्रारूप प्रभाग रचनेबाबतची अधिसुचना जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय, (Jalgaon ZP) जिल्हा परिषद कार्यालय व सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय व तसेच सर्व गटविकास अधिकारी यांचे कार्यालयात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. सदर प्रभाग रचनेसंदर्भात ज्यांना काही हरकती असतील, त्यांनी हरकती सकारण जिल्हाधिकारी यांचेकडे दिनांक ८ जूनपर्यंत लेखी सादर करावयाच्‍या आहेत. यावर सुनावणी विभागीय आयुक्त (Nashik) नाशिक यांचेकडे दिनांक १० जूनला घेण्यात येणार आहे.

दहा गट वाढले

जिल्‍हा परिषदेला यापुर्वी ६७ गट होते; यात लोकसंख्‍येच्‍या निकषानुसार १० गट व २० गण वाढले आहेत. यामध्‍ये चाळीसगाव तालुक्‍यात २, पारोळा, धरणगाव, अमळनेर, पाचोरा, रावेर, भुसावळ, जामनेर, एरंडोल या तालुक्‍यात प्रत्‍येकी एक गट वाढला आहे.

असे असतील गट गटाचे (कंसात ग्रामपंचायत संख्या)

चोपडाः– विरवाडे (१३), अडावद (८), अकुलखेडा (१७), लासुर (१५), चहार्डी (१६), वर्डी (२१).

यावलः– किनगांव बु. (९), दहिगांव (१२), न्हावी प्र. (७), बामणोद (१०), साकळी (१४), भालोद (१५).

रावेरः– पाल (१३), केर्‍हाळे बु. (१२), वाघोड (१८), निंभोरा बु. (१२), चिनावल (९), वाघोदा बु. (१३). तांदलवाडी (१८).

मुक्ताईनगरः– अंतुर्ली (१४), उचंदे (१७), कुर्‍हा (१५), हरताळे (१५).

भुसावळः– कंडारी (४), निंभोरा बु. (९), तळवेल (१५), कु-हे प्र.न. (११).

जळगावः– कानळदा (२२), असोदा (११), कुसुंबे खु. (११), शिरसोली प्र.न. (९), म्हसावद (१६).

धरणगावः– नांदेड (२४), पाळधी खु. (१३), पिंप्री खु. (२१), साळवा (१६).

अमळनेरः– कळमसरे (२६), पातोंडा (२०), दहिवद (२६), मांडळ (२५), जानवे (२२).

पारोळाः– शिरसोदे (१९), म्हसवे (२२), शिरसमणी (२२), तामसवाडी (२०).

एरंडोलः– विखरण (१६), रिंगणगांव (१७), कासोदा (७), तळई (१२).

जामनेरः– नेरी दिगर (१२), खडकी (१८), सामरोद (१४), पाळधी (१५), पहूर कसबे (११), पहूर पेठ (११), तोंडापूर (१२), फत्तेपूर (१३).

पाचोराः– बांबरूड प्र.बो. (१८), लोहारा (१३), पिंपळगांव बु. (१५), शिंदाड (१६), लोहटार (२१), नगरदेवळा (१७).

भडगावः– गिरड (१७), गुढे (१४), कजगांव (१८).

चाळीसगावः– बहाळ (१०), वाघळी (१७), टाकळी प्र.चा (९), उंबरखेड (१२), मेहुणबारे (१३), सायगाव (१४), हिरापूर (११), रांजणगाव (१३), घोडेगाव (११).

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: प्रणितीसह सुशीलकुमार शिंदे भाजपच्या वाटेवर? प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ

MI vs KKR, IPL 2024: मुंबईचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात! घरच्या मैदानावर मुंबईचा KKR कडून लाजिरवाणा पराभव

Maharashtra Politics 2024 : पवारांनी गल्ली ते दिल्लीपर्यंत फोडला घाम; पश्चिम महाराष्ट्रात अस्तित्वासाठी संघर्ष

Baramati Politics: विधानसभेतही बारामतीत महाभारत, अजित पवार यांना पुतण्या युगेंद्र देणार आव्हान?

Hardik Pandya Troll: हार्दिकने रोहितलाच केलं प्लेइंग ११ मधून बाहेर! फॅन्सच्या संतप्त प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT