Temperature
Temperature Saam tv
महाराष्ट्र

Temperature: राज्‍यात जळगाव ठरले ‘हॉट सिटी’

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : तापमानाचा उच्‍चांक दिवसेंदिवस वाढत आहे. ढगाळ वातावरण अन्‌ उन्‍हाच्‍या तिव्र झळांनी जणू काही उष्‍णता वाढल्‍याचा अनुभव सध्‍या जळगावात येत आहे. यात मागील दोन दिवसात वाढलेल्‍या उष्‍णतेने जळगाव (Jalgaon) हे राज्‍यातील ‘हॉट सिटी’ ठरले आहे. (jalgaon news high temperature Jalgaon becomes hot city in the state)

उन्‍हाळा म्‍हणजे दरवर्षी जळगावचे (Temperature) तापमान ४३ अंशाच्‍या वर कायम असते. यंदा मात्र उष्‍णतेची लाट अधूनमधून येत असल्‍याने यंदाचा उन्‍हाळा असह्य होत आहे. कडक तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत असून, रात्री उशिरापर्यंत उन्‍हाच्‍या झळा जाणवत असल्‍याने नागरीक हैराण झाले आहेत. सलग तीन दिवसांपासून जळगावातील तापमानाचा पारा हा ४५ अंशाच्‍या वर राहिला असून पुढील काही दिवस देखील ही स्‍थीती कायम राहण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.

उष्‍णतेची लाट कायम

कडक उन्‍हाचे चटके व यातून जाणवत असलेल्‍या उष्‍णतेपासून सध्‍या तरी दिलासा मिळणार नाही. मंगळवारी जळगावाचे तापमान ४५.८ अंश सेल्‍सीअस इतके नोंदविले गेले आहे. तिच स्‍थीती आज देखील कायम असून पुढील दोन– तीन दिवस असेल. जळगावनंतर (Akola) अकोल्‍यात देखील पारा ४५ अंशाच्‍या वर राहिला असून यानंतर नंदुरबार, औरंगाबाद, नागपूर शहरांचा समावेश आहे.

रात्री उकाडा

या आठवड्यात उन्‍हाच्‍या चटक्‍यांसोबत आभाळ देखील आले आहे. या उन सावल्‍यांच्‍या खेळात देखील उष्‍णता वाढली आहे. दिवसा तापत असलेल्‍या तापमानामुळे रात्री प्रचंड उकाडा होत आहे. यामुळे नागरीक त्रस्‍त झाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 7 मे ला नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Skin Care Tips: रात्रभर चेहऱ्यावर ऑलिव्ह ऑईल लावा; पिंपल्सच्या समस्या होतील दूर

Pankaja Munde: मी इथेच पाहिजे..; पंकजा मुंडेंनी बोलून दाखवली मनातील इच्छा

Explainer : ठाण्यात नरेश म्हस्केंना उमेदवारी, दुसऱ्या दिवशी भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; CM शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नेमकं काय घडतंय?

Chandrahar Patil : पृथ्वीराज पाटील यांचा विधानसभेत पराभव कोणी केला?; चंद्रहार पाटील यांनी केला गौप्यस्फोट

SCROLL FOR NEXT