बंद पडलेल्या रुग्णवाहिकेला धक्का देऊन पोहंचवले रुग्णालयात

बंद पडलेल्या रुग्णवाहिकेला धक्का देऊन पोहंचवले रुग्णालयात
Solapur News
Solapur NewsSaam tv

सोलापूर : सोलापुरात माणुसकीचे दर्शन घडविणारी घटना समोर आली आहे. एका अत्यावस्थ रुग्णाला घेऊन येणारी रुग्णवाहिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात येथे बंद पडली. रुग्णवाहिकेतील नातेवाइकांनी रडण्यास सुरुवात केली. हे कळताच तिथे थांबलेल्या तरुणांनी लगेच रुग्णवाहिकेला (Ambulance) धक्का देत रुग्णालयापर्यंत पोहोचविले. (solapur news youths pushed the closed ambulance to the hospital)

Solapur News
केंद्रीय मंत्री नारायण राणेंना दिलासा; धुळे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मंजूर

मोहोळ (Mohol) येथे एक रुग्ण बेशुद्ध पडला होता. त्याला घेऊन रुग्णवाहिका सोलापुरात (Solapur) आली. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रुग्णवाहिका आली असता ती बंद पडली. हे पाहून तिथे असलेले सामाजिक कार्यकर्ते राज सलगर आणि इतर तरुण सरसावले. त्यांनी बॅटरी बंद पडली असे समजून गाडीला धक्का देऊन ती सुरू करण्याचा प्रयत्न केला. पण त्यास यश आले नाही. त्यामुळे ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी आक्रोश सुरू केला. त्यानंतर या तरुणांनी या ॲम्ब्युलंसला धक्का देत हॉस्पिटलच्या दिशेने नेली.

मग रिक्षाचा सहारा

त्यानंतर काही अंतरावर गेल्यानंतर एका रिक्षाचालकाने या ॲम्बुलंसला धक्का देत रुग्णाला सुखरूप हॉस्पिटलला (Hospital) पोहोचवल्याचे पहायला मिळाले. मात्र अशा प्रकारच्या रुग्णवाहिकांचे ऑडिट करावे; अशी मागणी तरुणांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com