Temperature Saam tv
महाराष्ट्र

सुर्य ओकतोय आग..जळगाव, भुसावळात उच्‍चांकी तापमान

सुर्य ओकतोय आग..जळगाव, भुसावळात उच्‍चांकी तापमान

Rajesh Sonwane

जळगाव : शहरातील तापमानाने पंचेचाळीशी ओलांडली आहे. शनिवारी जळगाव व भुसावळचे तापमान ४५.५ अंश असल्याची नोंद करण्यात आली आहे. आज देखील तेवढेच तापमान आहे. रात्री नऊपर्यंत उन्हाच्या झळा सुरू असल्याने वृध्दांसह सर्वांनाच उन्हाचा त्रास होत असल्याचे चित्र आहे. (jalgaon news High temperature in Jalgaon and Bhusawal)

आठवडाभरापासून सुर्य अधिक तापत असून आता जणू काही आगच ओकू लागला आहे. यामुळे वैशाखाचा वणवा आता पेटू लागल्‍याचा भास होत आहे. जळगाव (Jalgaon) शहराचे शनिवारचे तापमान ४४ अंशावर होते. आज त्यात दीड अंशानी वाढ झाली. सकाळी दहापासूनच उन्हाचे असह्य चटके बसत होते. उन्हाच्या असह्य झळांनी नागरिकांची चांगलीच होरपळ होताना दिसली.

महामार्गावरही सन्‍नाटा

जळगावात शनिवारचा बाजार असतो. यामुळे मार्केट परिसर, व्यापारी संकुलात वर्दळ असते. परंतु, उन्हामुळे वर्दळ नव्हती. रस्तावरील (Bhusawal) वाहतूक तुरळक सुरूच होती. मुख्‍य म्‍हणजे कायम रहदारी असलेल्‍या महामार्गावर देखील दुपारी शुकशुकाट पहायला मिळाला. मोठ्या वृक्षांजवळ दुचाकीधारक सावलीत गप्पा करीत होते. तर अनेकजण उन्‍हाची तिव्रता कमी झाल्‍यानंतर बाहेर पडलेले पाहण्यास मिळाले.

थंडपेयाची मागणी

डोक्यावर रुमाल, टोपी बांधूनही उन्हाचा चटक बसतच होता. गारवा मिळविण्यासाठी नागरिकांनी शितपेय, आईस्क्रीम, उसाचा रस, टरबूजाचा वापर केला. मात्र उन्हाची तीव्रता एवढी होती की काही केला गारवा मिळत नव्हता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali: खुशखबर! प्राजक्ता माळीचा 'फुलवंती' आता मोफत पाहायला मिळणार, कधी अन् कुठे? वाचा अपडेट

Shirdi to Tirupati : शिर्डीवरून तिरुपतीला झटक्यात पोहचा, तब्बल १८ एक्सप्रेस धावणार, कोणकोणत्या स्थानकात थांबणार ट्रेन?

Maharashtra Live News Update: जायकवाडी धरण ९१ टक्के भरले, आज धरणाचे दरवाजे १८ फुटांनी उघडणार

Pune News: पुणेकरांनो आज पाणी जपून वापरा, शहरातील 'या' भागात कमी दाबाने पाणी पुरवठा

Ladki Bahin Yojana: लाडकीला जुलै महिन्याचे ₹१५०० कधी येणार? संभाव्य तारीख आली समोर, आजच नोट करा

SCROLL FOR NEXT