जळगाव : जळगाव विमानतळावर डूजेट एयरवेज ही खाजगी विमान कंपनी जळगांव ते मुंबई आणि जळगांव ते अहमदाबाद या हवाई मार्गावर सप्टेंबर 2019 पासून विमानप्रवाशांना सेवा देत आहे. टाटा कंपनीने तांत्रिक कारणांसाठी 20 एप्रिलपर्यंत जळगाव ते मुंबई, मुंबई ते अहमदाबाद अशी सेवा बंद केली आहे. (Jalgaon news Mumbai flight canceled next ten days)
विमान कंपनीने ऑपरेशनल रीजन या कारणामुळे काही काळासाठी विमानसेवा रद्द केली. कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार 20 एप्रिलपर्यंत (Jalgaon) जळगांव ते मुंबई विमानसेवा स्थगित करण्यात आलेली आहे. कंपनीतर्फे दूरध्वनीद्वारे असे कळविण्यात आले आहे की, काही दिवसांपासून तांत्रिक कारणामुळे कंपनीचे ऑनलाईन पोर्टलवरील बुकिंग सेवा बंद करण्यात आली आहे. जळगांव विमानतळावरील बुकिंग काउंटर सेवा सुद्धा बंद आहे.
थर्ड पार्टी एजन्सीकडून काढलेले तिकिट वाया
काही विमान प्रवाशांनी थर्ड पार्टी एजन्सीकडून यांच्या माध्यमातून जळगांव ते मुंबई या हवाईमार्गाचे टू जेट कंपनीच्या विमान प्रवासाचे तिकीट काढले होते. विमानतळावर आल्यावर विमानसेवा बंद असल्याचे कळाले. या सर्व बाबीवरून असे आवाहन करण्यात येत आहे, की दर जेट या खाजगी विमानसेवेने ऑनलाईन बुकिंग/ काउंटर बुकिंग सेवा बंद केलेली आहे. तशा आशयाची संबंधित बातमी स्थानिक वृतपत्रांमध्ये प्रकाशित झाली होती.
विमानतळ प्राधिकरणाचे आवाहन
संबंधित विमानप्रवाशी हे संकेत स्थळावरून तिकीट बुकिंग करीत असल्याने विमानसेवा सुरु आहे किंवा नाही याची त्यांना माहिती मिळत नाही. परिणामी त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सर्व विमानप्रवाशांनी हूजेट एयरवेजच्या अधिकृत संकेतस्थळावरुनच किंवा जळगांव विमानतळावरील तिकीट बुकिंग काउंटरवरूनच तिकीट बुकिंग करावे व तिकीट बुकिंग करण्याआधी, खात्रीसाठी हरूजेट एयरवेजच्या पुढील क्रमांकावर कार्यालयीन वेळेमध्ये संपर्क साधावा. 9154030663/saat- hemachander.b@trujet.com विमानतळ प्रशासन- 0257-2274114 (सोमवार ते शुक्रवार). असे विमानतळ प्राधिकरणाने कळविले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.