Gulabrao Patil Saam tv
महाराष्ट्र

Gulabrao Patil : ज्याला शिवी ऐकता येते त्याने आमदार व्हावं, महायुतीचे आमदार असं का म्हणाले?

Jalgaon News : गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या नेहमीच्या अंदाजात भाषणातून जोरदार फटकेबाजी केली. विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या बद्दल सुद्धा मंत्री गुलाबराव पाटील यांना मत व्यक्त केले

संजय महाजन

जळगाव : आमच्या पुढारी जातीला सर्व लोक शिव्या देतात. दुष्काळ पडला तरी शिव्या नाही पडला तरी शिव्या. आमचा तो धंदाच आहे. यामुळे ज्याला शिवी ऐकता येते त्याने आमदार व्हावं नाहीतर आमदार होऊ नये; असं वादग्रस्त वक्तव्य जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते तथा मंत्री गुलाबराव यांनी केलं आहे. 

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील खानदेश शिक्षण मंडळाच्या कार्यक्रमाप्रसंगी मंत्री गुलाबराव पाटील यांनी सदरचे विधान केले आहे. तर राजकारणात काही विषय नाही; असे म्हणत व्यासपीठावर बसलेल्या मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे बोट दाखवत हे तर कुणालाही पक्षात घेतात तुम्ही आहों, सब आहों..आमचं पण तेच. या शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या नेहमीच्या अंदाजात भाषणातून जोरदार फटकेबाजी केली. विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या बद्दल सुद्धा मंत्री गुलाबराव पाटील यांना मत व्यक्त केले. 

आम्ही बदनामीचा विचार करत नाही 

आम्ही फक्त एवढाच विचार करतो की आम्ही लोकांच्या सेवे करता काम करतो. आम्ही पण कुठल्या गोष्टीचा विचार करत नाही. आम्ही सुद्धा संघर्षातून वर आलो आहोत. लोकांनी आम्हाला गद्दारच करून टाकले आहे. यामुळे आम्ही बदनामीचा विचार करत नसल्याचे देखील मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. तसेच विद्यार्थ्यांना उद्देशून एवढी मोठी शैक्षणिक संस्था आहे. यातून कोणी कलेक्टर व्हावा, फौजदार व्हावा, डॉक्टर व्हावा आणि नाही जमलं तर आमच्या धंद्यात या.

मेहनत करा आणि एकाग्र व्हा; मंत्री गिरीश महाजन 

शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षण संपल्यापासून मी निवडणूक लढवत असून जिंकून येत आहे. सरपंच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सदस्य झालो. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व भाजपमध्ये आलो आणि राजकारणामध्ये सतत ४० वर्ष नॉट आउट आहे. माझे वडील शिक्षक होते त्यांनाही वाटत होतं आपला पोरगा शिकला पाहिजे; पण माझं डोकं खेळामध्ये चाललं. मात्र राजकारणात मी एकाग्र राहिलो आणि आज राजकारणातला सगळा हुशार विद्यार्थी आहे की नाही. चाळीस वर्षे राजकारणातील निवडून येणं सोपं नाही. पहिल्यांदा मंत्री म्हणून काम करतो. त्यामुळे निवडून सुद्धा येतो मात्र सलग सात वेळा निवडून सोपं नाही. तुम्ही मेहनत करा तुमचं लक्ष जे आहे त्यावर एकाग्र व्हा यश तुम्हाला नक्की मिळतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Women World Cup Final: हातात तिरंगा आणि पाणावलेले डोळे! एकमेकींना मिठी मारल्यानंतर हरमनप्रीत-स्मृतीला अश्रू अनावर

Rohit Sharma Reaction: रोहितला आठवला 19 नोव्हेंबर? महिलांनी वर्ल्डकप जिंकताच स्टँडमध्ये बसलेला हिटमॅन भावूक; रिएक्शन होतेय Viral

हरमनप्रीत कौरचा जबरदस्त डाव; त्या दोन षटकांत गेम फिरला, टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेच्या हातून ट्रॉफी हिसकावली

ICC Women World Cup: वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियावर पैशांचा वर्षाव; भारताला अन् उपविजेत्या दक्षिण आफ्रिकेला किती मिळणार पैसा?

IND W vs SA W Final: ५२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महिलांनी लिहिला इतिहास; टीम इंडियाच्या तीन खेळाडूंनी बदलली फायनलची कहाणी

SCROLL FOR NEXT