Gold Price Today Saam tv
महाराष्ट्र

Gold Price Today: सोन्‍याची उच्‍चांकी दराकडे वाटचाल; ३०० रूपयांची पुन्‍हा झाली वाढ

सोन्‍याची उच्‍चांकी दराकडे वाटचाल; ३०० रूपयांची पुन्‍हा झाली वाढ

Rajesh Sonwane

जळगाव : आठवडाभरापासून भाववाढ होत असलेल्या सोन्याच्‍या दरात (Gold Rate) पुन्हा ३०० रुपयांची वाढ झाली. यामुळे सोन्याने दर उच्चांकी पातळीवर पोहोचले असून प्रतितोळा सोने ५६ हजार ३०० रुपयांवर पोहचले आहे. (Maharashtra News)

सोने व चांदीच्‍या दरात आठवडाभरापासून (Gold Price Today) सातत्‍याने वाढ होत आहे. चांदीने देखील उच्‍चांक गाठला असून सोने देखील मागील दोन– अडीच वर्षात उच्चांकी दरावर पोहचले आहे. या दरम्‍यान दोन दिवसांत सोने ९०० रुपयांची महागले आहे. वर्षाअखेरीस अर्थात ३१ डिसेंबरला १५० रुपयांची वाढ होऊन सोने ५५ हजार ४०० रुपये प्रतितोळा पोहोचले होते. यानंतर दोन दिवस अर्थात १ व २ जानेवारी रोजी भाव स्थिर राहिले.

५७ हजाराचा राहिला आहे उच्‍चांकी दर

सोन्याचे दर अडीच वर्षापुर्वी उच्चांकीवर पोहोचले होते. ७ ऑगस्ट २०२० रोजी सोने ५७ हजार २०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले होते. आता देखील सातत्‍याने सोन्‍याच्‍या दरात होत असलेल्‍या वाढीमुळे सोने पुन्‍हा ५७ हजारावर पोहचण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon News : जळगाव शहरात कारमध्ये सापडली वीस लाख रुपयांची रोकड

Bigg Boss 18: सलमानच्या बिग बॉसमध्ये लागणार तडका; किम कार्दशियन घेणार वाइल्डकार्ड एन्ट्री?

VIDEO : आमदार शहाजी बापू पटलांचं मतदारांना भावनिक आवाहन; म्हणाले... | Marathi News

Chhatrapati Sambhajinagar: रेडीको एनव्ही कंपनीमधील बॉयलरचा स्फोट; 3 कामगारांचा मृत्यू

Maharashtra News Live Updates: नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात राडा, सीसीसीटीव्हीद्वारे आरोपींचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT