Jalgaon Railway Station Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Crime News: तरुणाला मारहाण करत सोनसाखळी लांबविली; जळगाव रेल्वेस्थानकावरील घटना

Jalgaon News : तरुणाला मारहाण करत सोनसाखळी लांबविली; जळगाव रेल्वेस्थानकावरील घटना

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : नेहमी गर्दीने भरलेल्या रेल्वेस्थानकावर क्राईम सतत सुरु असते. दरम्यान जळगाव रेल्वेस्थानकावर (Railway Station) मध्यरात्रीच्या सुमारास तरुणाला मारहाण करत त्याच्या गळ्यातील तीन तोळ्याची सोनसाखळी तोडून (Jalgaon) दोघे पसार झाले. या प्रकरणी शहर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील भूषण हिरालाल चौधरी (वय ३१) हा तरुण व्यवसाय करतो. नशिराबाद येथेच कुटुंबीयांसह वास्तव्यास आहे. दरम्यान भूषण हा २५ ऑक्टोम्बरला मध्यरात्री एकच्या सुमारास कामानिमित्त जळगाव रेल्वेस्थानकात आला होता. समोरील रिक्षा थांब्याजवळ उभा असताना चेतन दिलीप येवले आणि अविनाश विजय रंधे या दोघांनी भूषणची कुरापत काढली. कारण नसताना शिवीगाळ (Crime News) करून हुज्जत करण्यास सुरवात केली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वाद कशाला घालताय असे म्हणत भूषणने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला देाघांनी मारहाण करण्यास सुरवात केली. मारहाणीत भूषणच्या गळ्यातील तीन तोळे वजनाची ९७ हजार रुपयांची सेानसाखळी हिसकावून दोघे पसार झाले. सोनसाखळी तोडल्याचे लक्षात येताच भूषणने आरडा-ओरड केली. मात्र त्याच्या मदतीला कुणी आले नाही. यानंतर तो शहर पोलीस ठाण्यात पोचला. पोलिसांना माहिती दिल्यावर सांगितल्यानंतर मारहाण करणारे चेतन आणि अविनाश यांच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरू झाला. मात्र दोघे मिळून आले नाही. सहाय्यक उपनिरीक्षक बशीर तडवी तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: बात निकली है, तो बहोत दूर तक जाएगी; छगन भुजबळ यांचे शरद पवारांना प्रत्युत्तर

PM Modi: महाराष्ट्रातील निवडणुकीत कर्नाटकातील घोटाळ्यांच्या पैशांचा वापर, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर आरोप

News Explainer : राजकारणातून काकांचे निवृतीचे संकेत, पुतण्याने हेरली संधी? VIDEO

Raj Thackeray: भविष्यातल्या महाराष्ट्राला देवच वाचवू शकतो; चांदीवलीत राज ठाकरे असं का म्हणाले?

Maharashtra Politics : राज्यातील 40-42 मतदारसंघात अमराठींचा बोलबाला; परप्रांतीय मतं कोणाचं टेन्शन वाढवणार? वाचा

SCROLL FOR NEXT