जालना : आरक्षण मिळावे या मागणीसाठी आत्महत्या केल्याच्या घटना राज्यात घडल्या आहेत. याच दरम्यान (Jalna News) घनसावंगी तालुक्यातील आंतरवाली टेंभी गावात देखील आत्महत्या केली आहे. आरक्षणाच्या (Maratha Aarkshan) बैठकीसाठी उपस्थित राहील्यानंतर घरी जाऊन हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. मात्र आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. (Live Marathi News)
शिवाजी माने (वय ४२) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मराठा आरक्षणाच्या बैठकीसाठी शिवाजी माने हा उपस्थित होता. बैठकी संपल्यानंतर घरी जाऊन त्यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. माने यांना दोन एकर जमीन असून ते शेती व्यवसाय करत होते. घरची आर्थिक परस्थिती हलाखीची असल्याने त्यांच्या दोन्ही मुलांचा शिक्षण खर्च ही त्यांना करता येत नसल्याने ते अडचणीत असल्याची माहिती सामोरं आली. या प्रकरणी अत्ता तिर्थपुरी पोलिस अधिक तपास करत आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
यापूर्वी दोन वेळेस केला होता प्रयत्न
मयत याचे पत्नीसोबत वैवाहिक जीवनात वाद होते. सदर वादामुळे यापूर्वी दोन वेळेस मयत यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. याच कारणावरून सदरची गोष्ट घडल्याचे दिसून येत आहे. तसेच मयत यास दारू पिण्याचे व्यसन होते. मृतदेह हा उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालय जालना येथे आणण्यात आलेला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.