Girna Dam Saam tv
महाराष्ट्र

Girna Dam: सलग चौथ्‍या वर्षी गिरणा धरण शंभर टक्के भरण्याच्‍या मार्गावर; परतीच्या पावसाचा परिणाम

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : नाशिक, जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत सुरू असलेल्या तुफानी पावसाने जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पांपैकी गिरणा प्रकल्प (Girna Dam) पूर्ण भरण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे. गिरणा प्रकल्प पूर्णपणे भरण्याचे सलग चौथे वर्ष असून, यापूर्वी सलग तीन वर्षे प्रकल्प पूर्ण भरला आहे. (Jalgaon News Girna Dam)

जिल्ह्यातील (Hatnur Dam) हतनूर, गिरणा आणि वाघूर या मोठ्या प्रकल्पांसह अन्य लघु, मध्यम प्रकल्पांपैकी मोजकेच प्रकल्प वगळता अन्य प्रकल्पांत सद्यःस्थितीत सरासरी ८१.३९ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. जिल्ह्यातील (Jalgaon) मोठ्या प्रकल्पांपैकी गिरणा प्रकल्प सलग चौथ्या वेळेस पूर्ण भरण्याच्या मार्गावर असून, सद्यःस्थितीत ९८.२० टक्के जलसाठा आहे. यापूर्वी २००९ ते जुलै २०१९ दरम्यान अवर्षण अत्यंत कमी (Rain) पर्जन्यमानामुळे जेमतेम ३५ ते ३७ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा होता. तब्बल बारा वर्षांनंतर १७ सप्टेंबर २०१९ ला गिरणा प्रकल्प १०० टक्के भरल्याने प्रथमच पाच हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता.

तीन वर्ष शंभर टक्‍के भरले

आतापर्यंत २०१९, २०२०, २०२१ अशी सलग तीन वर्षे प्रकल्प पूर्ण भरला आहे. मात्र या वर्षी जुलै महिन्यात नाशिक जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे गिरणा प्रकल्पाने अवघ्या पाच ते सात दिवसांतच ३५ टक्क्यांवरून तब्बल ९२ टक्के जलपातळी गाठली. त्यामुळे १७ जुलै २०२२ ला गिरणा प्रकल्पातून विसर्ग केला जात आहे.

प्रकल्पात ९८.२० टक्के जलसाठा

गिरणा प्रकल्प पाणलोट क्षेत्रात, तसेच नदी उगप परिसरात गेल्या चार-पाच दिवसांपासून पाऊस सुरू आहे. गेल्या २४ तासांत प्रकल्प पाणलोट क्षेत्रात ३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, १८.९९ दलघमी पाण्याची आवक झाली आहे. गिरणा प्रकल्पाच्या वर असलेले चणकापूर, अर्जुनसागर (पुनंद), ठेंगोडा बंधारा, हरणबारी, नागासाक्या, केळझर आदी प्रकल्प ओव्हरफ्लो आहेत. गिरणा नदी पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे गिरणा प्रकल्पात पाण्याची आवक पाहाता प्रकल्पात ९८.२० टक्के जलसाठा असून, प्रकल्पाचे दोन गेट .६०, तर सहा गेट .३० मीटरने उघडून ९,८२६ क्यूसेकचा विसर्ग केला जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

SCROLL FOR NEXT