गिरणा 
महाराष्ट्र

गिरणात सुटणार २५ हजार क्‍यूसेक विसर्ग; नदी काठच्‍या गावांना सतर्कतेचा इशारा

गिरणात सुटणार २५ हजार क्‍यूसेक विसर्ग; नदी काठच्‍या गावांना सतर्कतेचा इशारा

साम टिव्ही ब्युरो

भडगाव (जळगाव) : गिरणा धरण सकाळी ९० टक्के भरले आहे. तसेच धरण क्षेत्रात पुराचे पाणी वेगाने येत असल्याने धरण भरण्याची शक्यता लक्षात घेऊन आज दुपारनंतर गिरणा धरणातून २५ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदी पात्रात सोडण्यात येणार आहे. यामुळे नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (jalgaon-news-girna-dam-90-parcantage-water-lavel-and-river-discharge-water-today)

गिरणा नदीच्या उगम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी पात्रात पाण्याचा प्रवाह वाढला आहे. आज सकाळी अकरा वाजेपर्यंत गिरणा धरण ९० टक्यांपर्यंत भरले आहे. धरण क्षेत्रात पूर पाण्याचा येवा पाहता आज दुपारपर्यंत धरण पूर्ण भरण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गिरणा धरणातून आज दुपारनंतर २५ ते ३० हजार क्यूसेक्स या वेगाने पाणी गिरणा नदी पात्रात सोडण्यात येणार आहे. त्याचबरोबर मन्याड धरणातूनही गिरणा नदीत १९ हजार क्यूसेक्स या वेगाने पाणी सुरू आहे.

प्रशासनाकडून आवाहन

या पार्श्वभूमीवर गिरणा नदी काठावरील गावातील रहिवाशांनी सतर्कता बाळगावी. नागरिकांनी नदीत जावू नये, तसेच जनावरे नदीजवळ जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्यासह कार्यकारी अभियंता श्री. अग्रवाल, उपविभागीय अभियंता हेमंत पाटील, शाखा अभियंता एस. आर. पाटील यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ek Deewane Ki Deewaniyat OTT : हर्षवर्धन राणेचा म्युझिकल रोमँटिक ड्रामा ओटीटीवर कधी येणार? वाचा अपडेट

Maharashtra Live News Update: पीएसआय गोपाळ बदनेच शेवटचं लोकेशन सापडलं

Vande Bharat Express : पुण्याहून धावणार आणखी एक वंदे भारत, ५५० किमीचा प्रवास फक्त ७ तासात, वाचा कोणकोणते थांबे असतील?

धावत्या ट्रेनमध्ये चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट; क्षणात सर्वत्र आगच आग, रात्री नेमकं काय घडलं?

Beauty Tips : घामामुळे मेकअप बिघडतो? फक्त 'या' टिप्स करा फॉलो, नेहमी दिसाल ब्युटिफूल

SCROLL FOR NEXT