Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

पहिली ते सातवीला आता सातऐवजी एकच पुस्तक

विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे होणार कमी

साम टिव्ही ब्युरो

रावेर (जळगाव) : पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना शाळेत जाताना दप्तराचे ओझे कमी व्हावे, यासाठी सात विविध विषयांची पुस्तके एकाच वेळी शाळेत नेण्याऐवजी या संपूर्ण अभ्यासक्रमाची तीन भागात विभागणी करून एकच पुस्तक न्यावे लागणार आहे. तसेच हे पुस्तक तयार करताना गणित आणि विज्ञान या विषयांत ठिकठिकाणी मराठीबरोबरच इंग्रजीतील संकल्पनांचाही वापर केल्याने विद्यार्थ्यांना आता द्विभाषिक पाठ्यपुस्तक या शैक्षणिक (Education) वर्षांपासून उपलब्ध होत आहे. या साठी महाराष्ट्र शासनाच्या शैक्षणिक विभागाने ‘एकात्मिक पाठ्यपुस्तक योजना’ तयार केली असून, तिची अंमलबजावणी २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून सुरू होत आहे. (jalgaon news From the first to the seventh now only one book instead of seven)

दप्तराचे ओझे कमी होणार

प्रमाणापेक्षा जास्त वजनाचे दप्तर वाहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये पाठ दुखी, मान दुखणे, डोकेदुखी, मानसिक ताण असे अनेक आजार, विकार निर्माण होत आहेत. हे सर्व टाळण्यासाठी शासनस्तरावरून विविध उपाययोजना (Jalgaon News) आणि सूचना यांची अंमलबजावणी केली जात आहे. यानुसार पहिली ते सातवी या इयत्तानिहाय सर्व विषयाच्या आशयाचे एकत्रीकरण करून पाठ्यपुस्तकांचे तीन भाग तयार करण्यात आले असून, हे भाग स्वतंत्रपणे विद्यार्थ्यांना वार्षिक वेळापत्रकानुसार एक-एक करून स्वतंत्रपणे शाळेत सोबत घेऊन जाता येणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना बालभारती (मराठी), सुलभभारती (हिंदी), इंग्रजी, गणित आणि विज्ञान (द्विभाषिक), इतिहास व नागरिकशास्त्र आणि भूगोल या सात विषयांची वेगवेगळी पुस्तके शाळेत नेण्याऐवजी एकच पुस्तक शाळेत नेता येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे नक्कीच कमी होणार आहे.

प्रथमच द्विभाषिक पुस्तके

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाने या वेळी तीन भागातील पुस्तके उपलब्ध करून दिली असून, सर्वच विद्यार्थ्यांना विनामूल्य वितरित केली जाणार आहेत. पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित आणि विज्ञान या विषयाच्या संदर्भात विविध संबोध, संकल्पना यांचे इंग्रजी अर्थ समजावेत, विषय सोपा वाटावा यासाठी मराठी शब्दांपुढे इंग्रजी शब्द देण्यात आले आहेत. तसेच त्या अनुषंगाने येणाऱ्या भाषेतील काही मराठी शब्दांचे इंग्रजी भाषेतील शब्द ही दिलेले आहेत. त्यानुसार आता गणित आणि विज्ञान या दोन विषयांचे स्वरूप आता द्विभाषिक झाले आहे.

पहिल्याच दिवशी विनामूल्य वितरण

एकात्मिक पाठ्यपुस्तक योजनेच्या माध्यमातून देण्यात आलेल्या या पाठ्यपुस्तकांमध्ये सर्व विषयांचा साधारणपणे तीन महिन्यांच्या कालावधीत वर्गात होणाऱ्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसाठी आवश्यक असा आशय समाविष्ट केलेला आहे. शाळा उघडल्याच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना या एकात्मिक द्विभाषिक पाठ्यपुस्तकाचे विनामूल्य वितरण केले जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shantanu Naidu Girlfriend : रतन टाटांचा विश्वासू शांतनु नायडूकडून प्रेमाची कबुली; फोटोतील तरुणी आहे तरी कोण?

Maharashtra Live News Update:आयुष कोमकर खूनप्रकरणी २ जणांना अटक तर १३ जणांवर गुन्हा

Pune Metro : पुणे मेट्रो सुसाट! २४ तासांत तब्बल ६ लाख जणांचा प्रवास, गणेशोत्सवात मेट्रोची कोट्यवधींची कमाई

Coconut Chikki Recipe :घरीच १० मिनिटांत बनवा खोबऱ्याची चिक्की, मिळेल मार्केटसारखी चव

Ankita Walawalkar : सलमान खानच्या 'Bigg Boss 19' मध्ये अंकिता वालावलकरची वाइल्ड कार्ड एन्ट्री? पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT