Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv

शिवसेनेकडून आदिवासी कार्यकर्त्याला उमेदवारी; शिवसैनिकांकडून जल्‍लोष

शिवसेनेकडून आदिवासी कार्यकर्त्याला उमेदवारी; शिवसैनिकांकडून जल्‍लोष
Published on

नंदुरबार : नंदुरबार शिवसेना जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी यांचे विधान परिषदेवर उमेदवारी जाहीर झाली. यानंतर शिवसेना (Shiv Sena) कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून व मिठाई वाटून जल्लोष करण्यात आला. (nandurbar news Shiv Sena vidhan parishad nominates aamshya padavi)

Nandurbar News
गतिमंद मुलीच्या उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून पित्याची आत्महत्या

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील आदिवासी नेतृत्व शिवसेना नंदुरबार जिल्हा प्रमुख आमश्या पाडवी यांची पक्ष श्रेष्ठींकडून विधान परिषदेवर उमेदवारी जाहीर झाली. याची बातमी कळताच स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांनी अक्कलकुवा आणि खापर येथे फटाके फोडून व मिठाई वाटून आमश्या दादा पाडवी आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत जल्लोष साजरा केला आहे.

आदिवासी कार्यकर्ता उमेदवार

शिवसेनेने महाराष्ट्राच्या सीमेवरील एका सामान्य आदिवासी कार्यकर्त्याला विधान परिषदेची उमेदवारी दिल्याने आमश्या दादा पाडवी व कार्यकर्त्यांकडून पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार व्यक्त केले जात आहे. आमश्या पाडवी यांची विधान परिषदेची उमेदवारी निश्‍चित झाल्यास जिल्ह्यात शिवसेना आमदाराचे खाते उघडणार आहे. याचा फायदा शिवसेनेला भविष्यात पक्ष मजबुतीसाठी होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com