Railway News Saam tv
महाराष्ट्र

Railway: चौथ्या रेल्वे मार्गाचे तांत्रिक कामाने गैरसोय; मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांचा खोळंबा

चौथ्या रेल्वे मार्गाचे तांत्रिक कामाने गैरसोय; मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांचा खोळंबा

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे भादली रेल्वे स्टेशनजवळ चौथ्या रेल्वे (Railway) मार्गावरील काम सुरू आहे. यात लाईनवरील सिग्नल यंत्रणा तसेच विद्युतीकरण असे तांत्रिक काम सुरू असल्‍याने कामाला उशीर होत असल्‍याने मुंबईकडे (Mumbai) जात असलेल्‍या रेल्‍वे उशिराने धावत आहेत. (Letest Marathi News)

रेल्वे प्रशासनातर्फे मंगळवारी सकाळपासून या कामाला सुरूवात करण्यात आली होती. या ठिकाणी एकाचवेळी (Jalgaon) सिंग्नल यंत्रणा, विद्युतीकरण, लॉक इंटरकटींग व इतर तांत्रिक कामे हाती घेण्यात आले. चौथ्‍या रेल्‍वे लाईनवरील सिग्‍नलचे काम मंगळवारी देखील रात्री उशिरापर्यंत सुरू होते. दरम्यान, या कामामुळे (Bhusawal) भुसावळ विभागातुन सुटणाऱ्या अप व डाऊनच्या अनेक पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. या कामामुळे मंगळवारीदेखील भुसावळहुन मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांचा खोळंबा झाला होता.

भुसावळ स्‍टेशनकडेच थांबविल्‍या गाड्या

रूळांच्या जोडणीचे देखील काम करण्यात आले. या कामाच्या ठिकाणी रेल्वेचे विविध विभागांचे अधिकारीदेखील थांबून होते. दरम्यान, या कामामुळे रेल्वे प्रशासनाने भुसावळहुन मुंबई व पुण्याकडे जाणाऱ्या सायंकाळच्या सत्रातील अमृतसर एक्सप्रेस, कृषीनगर एक्सप्रेस व महाराष्ट्र एक्सप्रेसला भुसावळ स्टेशनच्या अलीकडील इतर स्टेशनवर थांबविले होते. त्यामुळे या गाड्यांना अर्धा ते एक तासापर्यंत उशिर झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha Crime: एका हट्टापायी मैत्रीनं घेतला गळ्याचा घोट; खोलीत शिरला अन् तिला संपवून मोबाईल घेऊन पळाला

Voter Scam: हरियाणात 25 लाख व्होट चोरी; राहुल गांधींनी फोडला हायड्रोजन बॉम्ब

High Speed Internet: गावखेड्यात गतीमान इंटरनेट पोहोचणार; इलॉन मस्कच्या स्टारलिंकशी सराकारचा करार

Crime News: प्रियकर इम्रानसोबत प्लॅन आखला, नवऱ्याचे तुकडे करत समीरचा मृतदेह स्वयंपाक घरात पुरला; असा उलगडला हत्याकांड

Solapur : पूरग्रस्त दौऱ्याचा रात्रीस खेळ चाले; केंद्रीय पथक आलं, टॉर्चमध्ये काय पाहिलं? VIDEO

SCROLL FOR NEXT