Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : पंधरा वर्षीय मुलीला पळवून केले लग्न

Jalgaon News पंधरा वर्षीय मुलीला पळवून केले लग्न

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : शिरसोली शिवारात सालदारकी करणाऱ्या कुटुंबातील पंधरा वर्षीय मुलीचे दोन वर्षांपूर्वी अपहरण झाले होते. याबाबत (Jalgaon) एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. मात्र, २२ महिने पोलिस (Police) संशयित व पीडितेला शोधू शकले नाहीत. अखेर २८ जुलैला मध्यरात्री एमआयडीसी पोलिसांनी जामनेर शिवारातून संशयित सुनील बारेला याला अटक केली. न्यायालयाने त्याची पोलिस कोठडीत रवानगी केली. (Latest Marathi News)

जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील तुकाराम बारी यांच्याकडे सालदार म्हणून आदिवासी कुटुंब वास्तव्यास होते. या कुटुंबातील अल्पवयीन मुलीस ९ ऑक्टोबर २०२१ ला संशयिताने पळवून (Marriage) नेले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. गेली दोन वर्षे पीडिता व संशयित पोलिसांना मिळून आले नाहीत. मिळालेल्या माहितीवरून पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पथकाने तोंडापूर (ता. जामनेर) येथील एका शेतशिवारातून संशयित सुनील दलू बारेला (वय २४) याला अटक केली.

दरम्यान, संशयित सुनील दलू बारेला याने पीडितेशी मंदिरात विवाह करून घेतला व तो जामनेर तालुक्यात सालदार म्हणून काम करीत होता. पीडिता व संशयित यांना ११ महिन्यांचे बाळ असून, दोन वर्षांनंतर एमआयडीसी पोलिसांनी पित्याला अटक केली. बालिका अत्याचारातून बाळाचा जन्म झाल्यानंतर दाखल गुन्ह्यात अतिरिक्त कलम वाढविण्यात आले. संशयिताला न्यायाधीश केंद्रे यांच्या न्यायालयाने १ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे ॲड. सुरेंद्र काबरा यांनी काम पाहिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाशिकच्या इगतपुरीत दरड कोसळली, आदिवासी पाड्यांचा संपर्क तुटला

Nashik Crime News: नाशिकमध्ये चड्डी गँगचा कहर; घरात घुसून ४ तोळे सोनं लंपास| VIDEO

Israel : इराणनंतर इस्रायलचा येमेनवर हल्ला, येमेनची 3 प्रमुख बंदरं उद्ध्वस्त

Fact Check: पेट्रोल 45 रूपये लिटर होणार? सरकार पेट्रोलचे दर कमी करणार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Suspicious Boat : रायगड संशयित बोट प्रकरणात महत्त्वाचा खुलासा, पाकिस्तानवरुन वाहून आलेली संशयित वस्तू...

SCROLL FOR NEXT