Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : दोनच दिवसांपूर्वी घरून परतला; विद्यापीठाच्या वसतिगृहात विद्यार्थ्याचे टोकाचे पाऊल

Rajesh Sonwane

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील मुलांच्या वसतिगृहात अमरावती येथील विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना ११ सप्टेंबरला रात्री उघडकीस आली. या घटनेमुळे विद्यापीठ परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र या विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल कोणत्या कारणाने उचलले याचे कारण स्पष्ट झालेले नाही. 

अमरावती (Amravati) जिल्ह्यातील शिरसगाव येथील प्रतीक विजयराव गोरडे (वय १९) असे मृत तरुणाचे नाव आहे. प्रतीक हा विद्यापीठात बी. टेक (प्लॅस्टिक) प्रथम वर्षाला शिक्षण घेत होता. यामुळे तो कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील (NMU) मुलांच्या वसतिगृहात राहत होता. दरम्यान प्रतीक गोरडे हा दोन दिवसांपूर्वी वसतिगृहात राहायला आला होता. त्याच्या रूममध्ये पाच सहकारी होते. 

विद्यापीठाच्या मुलांच्या वसतिगृहात देखील गणपती बसविण्यात आलेला आहे. ११ सप्टेंबरला सायंकाळी सर्व मुलांनी गणपतीची आरती केली. यानंतर मुले जेवण्यासाठी निघून गेली. काही वेळानंतर मुले जेवणावरून परतले असता प्रतीक हा याच्या खोलीमध्ये आतून दरवाजा लावलेला दिसून आला. काही तरुणांनी खिडकीची काच तोडून पाहिले, तर प्रतीक गळफास घेतलेलय अवस्थेत दिसून आला. विद्यार्थ्यांनी माहिती देत त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विद्यापीठाच्या रुग्णवाहिकेत दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यास मृत घोषित केले. यानंतर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनोद पाटील, डॉ. सारंग, सुरक्षा निरीक्षकांसह विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. पाळधी दूरक्षेत्रात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पुण्यात काँग्रेसने राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ आंदोलन

Salman Khan: 'भाईजान'च्या जीवाला धोका? अज्ञात व्यक्तीने सुरक्षा ताफ्यात घुसण्याचा केला प्रयत्न; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

IPS Shivdeep Lande Resign : आयपीएस शिवदीप लांडे यांनी अचानक दिला राजीनामा; फेसबुकवर पोस्ट करत सांगितलं कारण

work pressure synonyms : वर्कलोड वाढलाय? आत्महत्येचा विचार मनात येण्याआधी वाचा कामाचा ताण दूर कसा करावा

Flower Pot: घरात या दिशेला चुकूनही ठेवू नका फ्लॉवर पॉट, होईल मोठं आर्थिक नुकसान

SCROLL FOR NEXT