Eknath Khadse
Eknath Khadse Saam tv
महाराष्ट्र

Eknath Khadse: प्रशासनावर जबाबदारी सोपवून महाराष्ट्र वाऱ्यावर; एकनाथ खडसेंचा सरकारवर निशाणा

संजय महाजन

जळगाव : राज्‍यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पुरात वाहून गेल्‍याच्‍या घटना आहेत. घरांची पडधड झाली असताना सरकारकडून कोणतीही मदत जाहीर केलेली नाही. प्रशासनावर जबाबदारी सोपविली असून महाराष्‍ट्र वाऱ्यावर असल्‍याचा टोला (NCP) राष्‍ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राज्‍य सरकारला लगावला आहे. (Jalgaon News Eknath Khadse)

यावल (Yawal) येथे कार्यकर्त्याला भेटण्यासाठी खडसे आले होते. यावेळी त्‍यांनी माध्‍यमांशी संवाद साधला. खडसे यांनी सांगितले, की राज्‍यात आलेल्‍या संकटात सरकारने मदत केली पाहिजे होती, ती होत नाही. यापुर्वी (Jalgaon News) असे संकट आल्‍यानंतर तात्‍काळ मदत केली जात होती. परंतु, आज पुरात वाहून गेला त्याला मदत नाही, घरांची परधड झाली तरी मदत न झाल्‍याने महाराष्ट्र वाऱ्यावर आहे.

परिस्थिती वाईट

प्रशासनावरती जबाबदारी सोपवलेली आहे. मंत्री मंडळाचा विस्‍तार झाला नसल्‍याने कोणत्‍याही जिल्‍ह्यात अजून पालकमंत्री नसल्यामुळे अवघड परिस्थिती झाली आहे. लोकप्रतिनिधी आपली भुमिका आक्रमक मांडू शकतो. अधिकारी आपल्या चौकटीतच काम करतात. यामुळे दुर्दैवाने परिस्थिती वाईट असल्‍याचे खडसे म्‍हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : निवडणुकांशिवाय भाजप देश जिंकू पाहतोय; संजय सिंह याचा गंभीर आरोप

Sam Pitroda Resigns: वादग्रस्त विधानाने काँग्रेसला टाकलं गोत्यात; सॅम पित्रोदा यांनी दिला राजीनामा; काय होता वाद?

Nagpur Earthquake : नागपूर जिल्हा चौथ्यांदा हादरला, बुधवारी 4 वाजता पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के

Delhi News: दिल्ली पोलिसांची ७ राज्यात मोठी कारवाई; गोल्डी ब्रार टोळीच्या १० शार्प शूटर्सना अटक

JP Nadda: सात दिवसांत पोलीस ठाण्यात हजर व्हा, जेपी नड्डा यांना कर्नाटक पोलिसांची नोटीस

SCROLL FOR NEXT