Delhi News: दिल्ली पोलिसांची ७ राज्यात मोठी कारवाई; गोल्डी ब्रार टोळीच्या १० शार्प शूटर्सना अटक

Goldie Brar gang Shooters Arrested: दिल्ली पोलिसांच्या स्पेशल पथकाने राजधानी दिल्लीच्या वेगवेगळ्या भागातून गोल्डी ब्रार टोळीच्या १० शूटर्सला अटक केली आहे. विशेष पथकाने राजस्थान, मध्यप्रदेश, बिहार, दिल्ली, यूपीसह ७ राज्यांमध्ये विशेष कारवाई करून या शूटरला पकडले आहे.
Goldie Brar gang Shooters Arrested
Goldie Brar gang Shooters Arrestedani

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, यूपी, बिहारसह ७ राज्यांमध्ये विशेष कारवाई करून १० शूटर्सना अटक केलीय. यावेळी पोलिसांनी ७ पिस्तुले आणि ३१ जिवंत काडतुसे तसेच ११ मोबाईल जप्त केले आहेत.

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, यूपी, बिहारसह ७ राज्यांमध्ये विशेष कारवाई करून १० शूटर्सना अटक केलीय. यावेळी पोलिसांनी ७ पिस्तुले आणि ३१ जिवंत काडतुसे तसेच ११ मोबाईल जप्त केली आहेत. अटक करण्यात आलेले सर्व शूटर्स फेसबुक, इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया हँडलद्वारे एकमेकांच्या संपर्कात होते.

तुरुंगात कैद असलेला लॉरेन्स बिष्णोई आणि परदेशात राहणारा गँगस्टर गोल्डी ब्रारच्या टोळक्यातील गुंड दिल्ली-एनसीआर आणि त्याच्या आजुबाजूच्या परिसरातील राज्यात खंडणी, हत्या, आणि इतर गुन्हे करतात. दरम्यान आज दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केलेले हे सर्व शुटर्स मोठा घातपात करण्याचा कट रचत होते. परंतु दिल्ली पोलिसांच्या कारवाईने याचा कट उधळला गेलाय. पोलिसांकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, पोलिसांच्या विशेष पथकाने केलेली कारवाई एसीपी ललित मोहन नेगी आणि एसीपी हदय भूषण यांच्या नेतृत्त्वात केली गेली.

अटक करण्यात आलेले शूटर्सची नावे

मंजीत सिंह उर्फ गुरी -२२ वर्षीय हा शूटर ८वी पर्यंत शिकलाय. तुरुंगात असताना याची भेट अजय राणाशी त्यानंतर अजय राणाने त्याची भेट गोल्डी ब्रारशी करून दिली. त्यानंतर हा लॉरेन्स बिष्णोईच्या गॅगमध्ये सहभागी झाला आणि त्यांच्यासाठी काम करू लागला. नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेल्या एका चकमकीदरम्यान आला अटक करण्यात आलीय.

गुरपाल -२६ वर्ष - गुरपाल हा १२ वीपर्यंत शिकलेला आहे. पंजाबमधील मोहालीमध्ये पोलिसांवर केलेल्या गोळीबारात याचा सहभाग होता. याच्याबरोबर मंजीतही यात सहभागी होता.

जसप्रीत सिंह वय २५- याचे शिक्षण फक्त १२ वी पर्यंत झाले आहे. याच्यावर एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सचिन कुमार वय २६- याचेही शिक्षण बारावी पर्यंत झाले आहे. याने इलेक्ट्रॉनिकमध्ये डिप्लोमा केलाय. हा लॉरेन्सच्या गॅगसाठी शस्त्र पुरवण्याचं काम करत होता.

संतोष ऊर्फ सुलतान बाबा वय २० - हा एका ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये हेल्पर म्हणून काम करत होता. हा उज्जैनमधील दुर्लभ कश्यपच्या टोळीत होता. कश्यपची हत्या झाल्यानंतर संतोप कश्यपच्या टोळीचा म्होरक्या झाला होता. यांच्यासह दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने मंजीत, अभय सोनी, धर्मेंद्र आणि संतोष कुमार यांना वेगवेगळ्या राज्यातून अटक करण्यात आलीय.

Goldie Brar gang Shooters Arrested
Haryana firing : हरियाणात पुन्हा गोळीबार; व्यावसायिकाची १५ गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com