अधिकाऱ्यांनी चक्क विहीर चोरली; नंदुरबार जिल्हा परिषदेचा धक्कादायक प्रकार

अधिकाऱ्यांनी चक्क विहीर चोरली; नंदुरबार जिल्हा परिषदेचा धक्कादायक प्रकार
Nandurbar ZP
Nandurbar ZPSaam tv

नंदुरबार : नंदुरबार जिल्हा परिषदेची स्थायी समितीत तालुक्यातील ठाणेपाडा येथे शासकीय आश्रम शाळेत विहीर मंजूर करून कागदावरच तयार झाल्या असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रत्यक्षात विहीर मात्र तयार केलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना गैरसोय निर्माण होते. जिल्हा परिषद (Zilha Parishad) पाणीपुरवठा विभागाच्या विहीरच चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Nandurbar Zilha Parishad News)

Nandurbar ZP
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! खाद्यतेलाचे दर तब्बल २० ते ४० रुपयांनी घसरले; पाहा नवे दर...

नंदुरबार (Nandurbar) तालुक्यातील ठाणेपाडा येथील आश्रम शाळेला जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातून विहिरीतून पाणी देण्याचे प्रस्तावित असताना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून त्या ठिकाणी विहीर खोदली. परंतु पाणीच लागले नसल्याचा दावा करण्यात आला होता. संबंधित (Nandurbar ZP) जिल्हा परिषदेचे स्थायी समितीचे सदस्य देवमन पवार यांनी या सर्व गोष्टींचा उलगडा करत ज्या ठिकाणी विहीरच खोदली नाही. तर पाणी लागणारच कुठून? असा सवाल उपस्‍थीत केला.

चौकशीचे आदेश

खोटे दाखले आणि चुकीची माहिती सभागृहाला अधिकारी देत असल्याचे देवमन पवार यांनी सांगून, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी पूर्त नामुष्कीला सामोरे जात वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील या गोष्टी अवगत करून सदर अधिकारी हे खोटे बोलून सभागृहात अधिकाऱ्यांची व सदस्यांची दिशाभूल करण्याचा प्रकार उघडकीस आणला आला आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्ष यांनी याबाबत सखोल चौकशी करून कारवाई करावी अशा सूचना केल्यात.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com