Sam Pitroda Resigns: वादग्रस्त विधानाने काँग्रेसला टाकलं गोत्यात; सॅम पित्रोदा यांनी दिला राजीनामा; काय होता वाद?

Sam Pitroda Resigns: सॅम पित्रोदा यांनी नुकतेच वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या भारतीयांच्या ओळखीबाबत वांशिक विधान केलं होतं. यानंतर भाजपने त्यांच्यावर हल्लाबोल केला आणि काँग्रेसला या वक्तव्यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं.
Sam Pitroda Resigns: वादग्रस्त विधानाने काँग्रेसला टाकलं गोत्यात; सॅम पित्रोदा यांनी दिला राजीनामा; काय होता वाद?
Sam Pitroda ResignsANI
Published On

नवी दिल्ली : आपल्या विधानामुळे स्वत: काँग्रेसला गोत्यात आणणारे सॅम पित्रोदा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. पित्रोदा यांनी इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून काँग्रेसने त्यांचा राजीनामा तात्काळ स्वीकारलाय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी X वर पोस्ट करताना याबाबत माहिती दिलीय.

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती देताना सांगितलं की, सॅम पित्रोदा यांनी आपल्या मर्जीने आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. त्यांनी सॅम पित्रोदाने इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पित्रोदा यांच्या राजीनामा काँग्रेस अध्यक्षाच्या टेबलावर येताच बरोबर काँग्रेस अध्यक्षांनी त्यांचा राजीनामा स्विकारत त्यांना पदमुक्त केलंय.

सॅम पित्रोदा यांनी जातीयवादी वक्तव्य केल्याने भाजपकडून त्यांच्यावर टीका केली जात होती. जयराम रमेश यांनी सॅम पित्रोदा यांच्या राजीनाम्याचे कारण दिलेले नाही. मात्र त्यांनी नुकत्याच केलेल्या जातीयवादी वक्तव्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागल्याचं सांगितलं जात आहे. पित्रोदा यांनी आज एक वादग्रस्त विधान विधान केलं होतं. यात त्यांनी म्हटले होते की, पूर्व भारतीय हे चिनी लोकांसारखे दिसतात. दक्षिण भारतीय आफ्रिकन लोकांसारखे दिसतात. या वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्षाने पित्रोदा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. पित्रोदा यांच्या वक्तव्यामुळे होणारी टीका पाहता काँग्रेस पक्षाने त्यांच्यापासून दूर राहणं पसंत करत ते त्यांचे वैयक्तिक विधान असल्याचं म्हटलंय.

पित्रोदा यांच्या वक्तव्याला मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांनी दुर्दैवी म्हटलंय. यामुळे ईशान्येकडील आणि देशाच्या इतर भागांतील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्याचं ते म्हणाले. जेव्हा आपण काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून अशी अपमानास्पद भाषा वापरताना ऐकतो तेव्हा असे दिसते की हे लोक अजूनही भेदभावपूर्ण वृत्तीने त्रस्त आहेत.

या विधानामुळे ईशान्येतील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्यात. त्यामुळे ते जे काही बोलले, ते कोणत्याही संदर्भात बोलले तरी ते योग्य नसल्याचं असं कॉनरॅड संगमा म्हणाले. मेघालयचे मुख्यमंत्री पुढे म्हणाले, 'आपला देश हा विविधतेचा देश आहे. देशाचे तत्त्व आपल्या लोकांच्या विविधतेवर आधारित आहे, मग ते संस्कृती असो वा रंग- रुप, या गोष्टी भारताला भारत बनवत असतात.

दरम्यान एका पॉडकास्ट कार्यक्रमात सॅम पित्रोदा यांनी मुलाखत दिली होती. त्यात भारताविषयी बोलताना ते म्हणाले, 'आम्ही भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशाला एकसंध ठेवू शकतो. पूर्वेकडील लोक चिनी लोकांसारखे, पश्चिमेकडील लोक अरबांसारखे, उत्तरेकडील लोक गोरे आणि दक्षिण भारतीय आफ्रिकन लोकांसारखे दिसतात. पण याने काही फरक पडत नाही, आम्ही सर्व बहिणी आणि भाऊ आहोत. भारतात वेगवेगळ्या प्रदेशातील लोकांच्या चालीरीती, खाद्यपदार्थ, धर्म, भाषा भिन्न आहेत, परंतु भारतातील लोक एकमेकांचा आदर करतात.

Sam Pitroda Resigns: वादग्रस्त विधानाने काँग्रेसला टाकलं गोत्यात; सॅम पित्रोदा यांनी दिला राजीनामा; काय होता वाद?
Sam Pitroda Statement : दक्षिण भारतीय आफ्रिकन लोकांसारखे दिसतात; सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्याने खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com