Eknath Khadse |Raksha Khadse saam tv
महाराष्ट्र

Eknath Khadse: सुनबाईसाठी एकनाथ खडसे मैदानात; 'भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरण्याआधीचं केली प्रचाराला सुरूवात!

Eknath Khadse News: पक्षाच्या वरिष्ठांनी आपल्याला प्रवेश झाल्यासारखे असल्याच सांगितले असल्याने आपण भाजपा उमेदवार रक्षाताई खडसे यांच्या प्रचारात सक्रिय झालो असल्याचे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले आहे.

संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव

जळगाव|ता. ३ मे २०२४

एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांची साथ सोडत भाजपमध्ये घरवापसी करत असल्याची घोषणा केली. मात्र त्यांचा पक्षप्रवेशाचा मुहूर्त काही अद्याप ठरलेला नाही. अशातच आता माझा पक्षप्रवेश झाल्याचे म्हणत ते सुनेच्या प्रचारासाठी मैदानात उतरलेत. पक्षाच्या वरिष्ठांनी आपल्याला प्रवेश झाल्यासारखे असल्याच सांगितले असल्याने आपण भाजपा उमेदवार रक्षाताई खडसे यांच्या प्रचारात सक्रिय झालो असल्याचे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले आहे.

एकनाथ खडसे प्रचारात..

भाजप प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेले माजी मंत्री व जेष्ठ आमदार एकनाथराव खडसे यांनी वरिष्ठांचे सूचनेनुसार रावेर लोकसभेच्या भाजपा उमेदवार रक्षाताई खडसे यांच्या प्रचारास सुरुवात केली आहे. मंगळवारी त्यांनी यावल येथील भाजपा प्रचार कार्यालयास भेट देत कार्यकर्त्यांना सूचना देत आढावा घेतला. भाजपामध्ये प्रवेश करीत असल्याचे आमदार एकनाथराव खडसे यांनी जाहीर केल्यानंतर अद्याप प्रचारात सक्रिय झाले नव्हते. मात्र दोन दिवसापासून प्रचारात सक्रिय झाल्याचे त्यांनी सांगितले.

पक्षप्रवेशाबाबत काय म्हणाले?

"मी वरिष्ठांकडे माझ्या भाजप प्रवेशाबाबत मी सूचित केले होते. त्यानुसार भाजपाचे वरिष्ठ नेते विनोद तावडे तसेच भाजपाचे प्रांताध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना माझा प्रवेश कधी जाहीर करणार? असे त्यांना विचारले असता त्यांनी प्रवेशाची तारीख कळवणार असल्याचे सांगून तुमचा प्रवेश झालेलाच आहे. बैठका घेण्यास व प्रवास करण्यास हरकत नाही, असं सांगितल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.

"त्यानुसार मी गेल्या दोन दिवसापासून प्रचारात सक्रिय झालो असून यवला हे माझे प्रचारार्थ आठवे गाव असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी निवडणुकीत रावेर लोकसभा निवडणूक मतदार संघ अंतर्गत भाजपा उमेदवारास किती लीड मिळेल यापेक्षा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे मतदारांचे मतदानाचे प्रमाण यावर लीड अवलंबून असेल तरीही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील विश्वास व कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता रक्षाताई खडसे प्रचंड बहुमताने निवडून येतील असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डोळ्यासमोर पीक गेले वाहून; शेतकऱ्याला अश्रू अनावर|VIDEO

Crime News : नागपूर हादरलं! ११ वर्षांच्या मुलाची खंडणीसाठी हत्या, झुडपात आढळला मृतदेह

PAK vs UAE: आधी नकार आता होकार; आशिया कपमध्ये पाकिस्तानचा ड्रामा; उशिराने सुरू होणार थरारक सामना

Thursday Horoscope: मनस्ताप वाढेल की खर्च?, २ राशींसाठी गुरुवार कसा असणार? वाचा राशीभविष्य

Maharashtra Live News Update: माढा-वैराग मार्गावरील सीना नदीवरील पूल पाण्याखाली,वाहतुक बंद

SCROLL FOR NEXT