Jalgaon Pachora News Saam tv
महाराष्ट्र

बहिणीकडे गेलेल्‍या भावाची भाऊबीज ठरली अखेरची; पाण्यात बुडुन दुर्दैवी मृत्यू

बहिणीकडे गेलेल्‍या भावाची भाऊबीज ठरली अखेरची; पाण्यात बुडुन दुर्दैवी मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

निंभोरी (जळगाव) : भाऊबीजेचा पवित्र सण साजरा करण्यासाठी आपल्या लाडक्या बहिणीचे आशिर्वाद घेण्यासाठी गेलेल्या (Pachora) पाचोरा येथील 17 वर्षीय युवकाचा वालझिरी (चाळीसगाव) येथील नदीपात्रात पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू (Death) झाला. यामुळे चौधरी कुटुंबियावर काळाने घाला घातला आहे. (Maharashtra News)

पाचोरा शहरातील श्रीराम नगरातील रहिवाशी राहुल सुरेश चौधरी (वय 17) हा युवक 27 ऑक्टोंबरला भाऊबीजेसाठी बहिणीकडे गेला होता. बहिणीचे आशिर्वाद घेत मोठ्या उत्साहात भाऊबीज सण साजरा करण्यात आला. दरम्यान त्‍याच दिवशी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास राहुल हा वालझिरी (चाळीसगाव) येथे आयोजित नवसाच्या कार्यक्रमात सहभागी झाला होता. दरम्यान नदीपात्राजवळ हात पाय धुण्यासाठी गेला असता राहुल याचा पाय घसरून तो खोल पाण्यात पडला.

तात्‍काळ काढले परंतु...

सदरचा प्रकार त्याच्‍या सोबत असलेल्या चिमुकल्यांनी परिवारातील सदस्यांना सांगितला. यानंतर तात्काळ उपस्थितांच्या मदतीने राहुल यास पाण्यातुन बाहेर काढत लागलीच चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी राहुल यास मृत घोषित करताच कुटुबिंयांनी एकच हंबरडा फोडला. मयत राहुल चौधरी याचे पाश्चात्य वृद्ध आई, बहिण, पाहुणे असा परिवार असुन राहुल चौधरी याचे घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. अतिशय मनमिळाऊ व हसमुख स्वभावाचा राहुल याचे दुर्दैवी मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections Result Live Update : नवी मुंबईमध्ये पुन्हा एकदा गणेश नाईक यांची सरशी

Mumbai Vadapav Connection: मुंबईकरांना वडापाव अधिक का आवडतो? जाणून घ्या ही ५ कारणे

Tata Punch Price: फक्त 5.59 लाखात आलिशान कार, भन्नाट फीचर्स पाहून वेडे व्हाल

BMC Election Result: मुंबईत भाजप- ठाकरेंमध्ये काँटे की टक्कर, सुरूवातीच्या कलांमध्ये कुणाला किती जागा?

8th Pay Commission: आठवा वेतन आयोग लागू झाल्यावर कर्मचाऱ्यांना मिळणार लाखो रुपये; वाचा एरियरचं कॅल्क्युलेशन

SCROLL FOR NEXT