railway 
महाराष्ट्र

मुंबई पॅसेंजर अद्यापही बंदच; खासदारांचे आश्‍वासन हवेतच

मुंबई पॅसेंजर अद्यापही बंदच; खासदारांचे आश्‍वासन हवेतच

साम टिव्ही ब्युरो

चाळीसगाव (जळगाव) : चाळीसगाव, पाचोरा, नांदगाव तालुक्यातील चाकरमान्यांसह गोरगरीब प्रवाशांसाठी महत्त्वाची असलेली पॅसेंजर अद्यापही सुरू झालेली नाही. सुरत-भुसावळ पॅसेंजर सुरू झाल्याने मध्य रेल्वेमार्गावरील या पॅसेंजरसह देवळाली-भुसावळ शटल सुरू करावी, अशी मागणी होत आहे. या संदर्भात काही दिवसांपूर्वी प्रवाशांनी खासदार उन्मेष पाटील (MP Unmesh Patil) यांना निवेदनही दिले होते. त्या वेळी त्यांनी रेल्वेच्या संबंधित वरिष्ठांशी प्रत्यक्ष भेटून हा प्रश्‍न प्राधान्याने सोडवू, असे आश्‍वासन दिले होते. मात्र, अजूनही पॅसेंजर सुरू न झाल्याने खासदारांनी दिलेले आश्‍वासन फोल ठरल्याचे दिसत आहे.

चाळीसगाव (Chalisgaon), पाचोरा व नांदगाव येथून हजारो प्रवासी दररोज प्रवास करतात. अनेक जण नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने दररोज जळगाव, नांदगाव, नाशिकला (Nashik) जात असतात. शिक्षणासाठी जळगावला जाणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. हे सर्व विद्यार्थी नाशिक ते भुसावळदरम्यान असलेल्या छोट्या छोट्या स्टेशनवरून प्रवास करतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-भुसावळ पॅसेंजरसह (Mumbai Bhusawal Passanger) देवळाली-भुसावळ शटल बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह चाकरमाने व सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत.

नियमित तिकीटही मिळेना

सध्या ज्या काही रेल्वेगाड्या सुरू आहेत, त्यांचे साधे तिकीटच प्रवाशांना मिळत नाही. त्यामुळे प्रवाशांना नाइलाजास्तव जास्तीचे भाडे देऊन खासगी वाहनाने जावे लागते. सध्या एस.टी. कर्मचाऱ्यांचाही संप सुरू असल्याने बस रस्त्यावर धावत नाहीत. परिणामी, खासगी वाहनचालक प्रवाशांना वेठीस धरून अव्वाच्या सव्वा भाडे आकारत असतात. खासगी ट्रॅव्हल्सच्या बाबतीतही अशीच परिस्थिती आहे. मनमानीपणे जास्तीचे भाडे प्रवाशांकडून आकारले जात आहे. रेल्वेचे तिकीट केवळ अगोदर आरक्षित केले असेल तरच दिले जाते. त्यामुळे किमान नियमित तिकीट देणे तरी सुरू करावे, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Running Benefits: सकाळी धावण्याचे शरीरावर काय परिणाम होतो?

Psychological Fact : नजर लागण्यामागे दडलं आहे एक सायकॉलॉजिकल सत्य, आत्ताच जाणून घ्या

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Jio Recharge Plan: फक्त ८९५ रुपयांत मिळणार ३३६ दिवसांची सेवा, जिओने दिला ग्राहकांसाठी मोठा लाभ

Vidarbha News : शेतातून येताना पावसात अक्रीत घडलं, ३ महिलांच्या अंगावर वीज कोसळली, बुलढाण्यात हळहळ

SCROLL FOR NEXT