Online Fraud Saam tv
महाराष्ट्र

Online Fraud : लाइकचा टास्क पडला महागात; डॉक्टरांची १२ लाखात ऑनलाइन फसवणूक

Jalgaon News : ९ ते २४ नोव्हेंबरदरम्यान त्यांना टेलीग्रामवर एक लिंक आली. त्यांनी ती लिंक ओपन केल्यानंतर त्यांना टास्क देण्यात आला.

Rajesh Sonwane

जळगाव : टेलिग्रामवर आलेली लिंक लाईक करून फोटोंना लाईक करण्याचा टास्क स्वीकारणे डॉक्टरला महागात (Jalgaon) पडले आहे. हा टास्क देऊन पैसे गुंतवणुकीचे आमिष देऊन फसवणुकीचा प्रकार घडला आहे. यात जळगावच्या जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात (Jalgaon Medical Collage) कार्यरत डॉक्टराची १२ लाख ४२ हजारात ऑनलाइन फसवणूक झाली. (Maharashtra News)

उमरसरा (जि.यवतमाळ) येथील मूळ रहिवासी असलेले डॉ. प्रणव परशुराम सामृतवार हे जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत आहेत. ते महाविद्यालयाच्या परिसरात शासकीय निवासस्थानात वास्तव्यास आहेत. ९ ते २४ नोव्हेंबरदरम्यान त्यांना टेलीग्रामवर एक लिंक आली. त्यांनी ती लिंक ओपन केल्यानंतर (Online Fraud) त्यांना टास्क देण्यात आला. त्यानंतर ऑनलाइन सक्रिय सायबर गुन्हेगारांनी या लिंकद्वारे डॉ. सामृतवार यांच्याशी संपर्क करून त्यांना पाठवलेल्या (Cyber Crime) लिंकवरील फोटोला लाईक करण्याचा टास्क दिला. त्यामध्ये पैसे गुंतवणूक करून सुरुवातीला त्यांना ९ हजार १५० रुपये देऊन त्यांचा विश्वास संपादन केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सुरवातीला पैसे मिळाल्याने सायबर गुन्हेगारांनी सांगितल्याप्रमाणे डॉक्टरांनी पैसे गुंतविले. त्यानुसार १२ लाख ४२ हजारांची गुंतवणूक केली. परंतु गुंतवणुकीचा परतावा मिळाला नाही. उलट अधिक पैसे द्यावे लागत असल्याचे निदर्शनास आल्यावर फसवणूक होत असल्याचे कळताच डॉ. प्रवण यांनी सायबर पोलिसांत जात तक्रार दिली. सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Neeti : वैवाहिक जीवनात कटकट, चीडचीड नको; तर 'या' चार गोष्टी लक्षात ठेवा

Maharashtra Live News Update: भांडुपमधील एका सार्वजनिक शौचालयात सापडलं स्त्री जातीचं अर्भक

Election Commission: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबरला आरक्षण सोडत

Hair Care: हेल्दी आणि शायनी केस हवेत? मग 'हा' पदार्थ नक्की ट्राय करा, आठवड्याभरात दिसेल फरक

Fodnicha Bhat Recipe : ऑफिसवरून आल्यावर झटपट बनवा 'असा' चटपटीत फोडणीचा भात, आवडीने खातील सगळे

SCROLL FOR NEXT