एसटी
एसटी  
महाराष्ट्र

ऐन गर्दीत एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद; प्रवाशी वेठीस

संजय महाजन

जळगाव : वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी महामंडळाच्‍या जळगाव आगारातील कर्मचाऱ्यांनी आज दुपारपासून अचानक काम बंद आंदोलन सुरू केले. मागण्या पूर्ण होईपर्यंत काम न करण्याचा पवित्रा त्यांनी घेतल्याने येथून जाणाऱ्या बस सेवेवर परिणाम झाला असून भाऊबिजनिमित्‍ताने गावी जाणाऱ्यांची गर्दी असल्‍याने प्रवाशी वेठीस धरण्याचा प्रकार झाला आहे. (jalgaon-news-crowded-ST-employees-off-work-In-the-passenger-seat)

राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या कर्मचारी राज्‍यभरात आंदोलन करत आहेत. वेतनवाढीसह अन्‍य मागण्यांकरीता हे आंदोलन केले जात आहे. दिवाळीपुर्वी दोन दिवस राज्‍यभरातील सर्व आगारांमध्‍ये कर्मचारी संपावर असल्‍याने बससेवा बंद झाली होती. यानंतर राज्‍य सरकारने आंदोलन बेकायदेशीर असल्‍याचे ठरवत कर्मचारींना कामावर रूजू होण्याचे सांगितले होते. यानंतर काही ठिकाणी बससेवा सुरू झाली. परंतु, अजून देखील काही ठिकाणी आंदोलन केले जात आहे.

जळगाव आगार अचानक बंद

दिवाळी उत्‍सव हा महामंडळासाठी गर्दीचा हंगाम मानला जातो. या दिवसात महामंडळाला मोठ्या प्रमाणा उत्‍पन्‍न मिळत असते. परंतु, या गर्दीच्‍या हंगामातच बससेवा बंद केल्‍याने उत्‍पन्‍न बुडत आहे. जळगाव आगारातील कर्मचाऱ्यांनी आज दुपारनंतर अचानक काम बंद आंदोलन पुकारले आहे. सकाळपासून सुरळीत बससेवा सुरू असताना कामबंद आदोलनामुळे सेवा विस्‍कळीत झाली आहे.

प्रवाशी वेठीस

राज्‍य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्‍या मागण्या रास्‍त आहेत. परंतु, भाऊबिजनिमित्‍ताने माहेरवासीनींची गर्दी आहे. तर काहीजण दिवाळीला गावी आले असताना आज रविवारनंतर सुटी संपणार असल्‍याने परतीच्‍या प्रवासाला लागले आहेत. यामुळे बसला गर्दी आहे. अशा काळात कर्मचाऱ्यांनी मागण्यांसाठी बससेवा बंद करणे म्‍हणजे प्रवाशी वेठीस धरण्याचा प्रकार झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain News : राज्यात आजही अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्याचा तडाखा; केळीच्या बागा भूईसपाट, विदर्भाला अतिवृष्टीचा इशारा

Today's Marathi News Live: पुणे सोलापूर रोडवर होर्डिंग कोसळलं; वाहनांचं मोठं नुकसान

Team India Head Coach : गौतम गंभीर होणार भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक?; २ संकेत अन् जोरदार चर्चा

Arvind Kejriwal: 'उद्या मी सर्व नेत्यांसोबत भाजप मुख्यालयात येतोय, ज्यांना अटक करायची आहे, करा', केजरीवाल यांचं थेट PM मोदींना आव्हान

Sobhita Dhulipala : गुलाबी ड्रेस अन् कानात झुमके छान छान, कान्समध्ये शोभिताचा जलवा!

SCROLL FOR NEXT