minor girl kidnapped saam tv
महाराष्ट्र

Crime News: एकीला पळवून नेत केला विवाह; ती घरात असताना पुन्‍हा अल्पवयीन मुलीचे केले अपहरण

एकीला पळवून नेत केला विवाह; ती घरात असताना पुन्‍हा अल्पवयीन मुलीचे केले अपहरण

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : कुसुंबा (ता. जळगाव) येथील २४ वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीचे सहा महिन्यांपूर्वी अपहरण केले होते. गुन्हे शाखेने पीडितासह संशयिताला अटक केली असून, त्याने यापूर्वी अशाच एका मुलीला पळवून नेत सज्ञान झाल्यावर सोडून दिल्यावर तिचा मृत्यू झाला होता. (jalgaon crime news girl kidnapped and married She kidnapped another minor girl)

जळगाव (Jalgaon) शहरातील गणेश कॉलनीतील सतरावर्षीय मुलीला कृष्णा गोरे (वय २४, रा. कुसुंबा) याने अपहरण (Kidnapping Case) करून नेले होते. त्या मुलीशी लग्न करून तो तिला घरी घेऊन आला. ती घरीच राहात असताना कृष्णाने वराडसीम (ता. भुसावळ) येथील सतरावर्षीय दुसऱ्या मुलीसोबत सोशल मिडीयावरून (Social Media) मैत्री करत तिला घेऊन पसार झाला होता.

तिचा संशयास्‍पद मृत्‍यू

याच दरम्यान लग्न करून आणलेल्या मुलीचा ५ नोव्‍हेंबरला संशयास्पद मृत्यू झाला होता. मुलीचे पिता राजेंद्र खैरनार यांनी याप्रकरणी पोलिसांत (Jalgaon Police) तक्रार दिल्यावरून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी तपासाची सूत्रे गुन्हे शाखेला सोपविल्यावर निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी तपास चक्रे फिरविली.

पीडित सहा महिन्यांची गर्भवती

कृष्णा गोरे याने पळवून नेलेल्या पीडितेवर (Minor Girl Kidnapped) सलग वर्षभर अत्याचार केल्यावर ती गर्भवती राहिली असून, गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे निरीक्षक बकाले यांच्या पथकातील उपनिरीक्षक अमोल देवरे, किशोर राठोड, रणजित जाधव, श्रीकृष्ण देशमुख, विनोद पाटील, योगिता पाचपांडे, मुरलीधर बारी अशांच्या पथकाने कल्याण (जि. ठाणे) गाठले. येथे भाड्याची खोली घेऊन वास्तव्यास असल्याचे आढळून आले असून, पीडितेसह त्याला ताब्यात घेत रात्री पथक जळगावी धडकले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनमाडकरांना दिलासा; पाणी पुरवठा करणारे वागदरडी धरण 50 टक्के भरले

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, सर्वाधिक व्याजाचा लाभ कुणाला मिळणार?

Relationship Tips : रिलेशनशिपमध्ये सतत भांडणं का होतात?

Maharashtra Politics: ठाकरे ब्रॅंड असता, तर बाळासाहेब असतानाच 288 आमदार आले असते - संजय गायकवाड|VIDEO

Lucky Zodiac Signs: 'या' 5 राशींना पावणार विठुराया; संकटं दूर होतील घरात येईल लक्ष्मी

SCROLL FOR NEXT