Shahada News: शहादा- तळोदा टॅक्सी प्रवासाचे तिकीट दरही निश्‍चीत; अवाजवी भाड्यावर अंकुश

शहादा- तळोदा टॅक्सी प्रवासाचे तिकीट दरही निश्‍चीत; अवाजवी भाड्यावर अंकुश
private taxi rent
private taxi rentsaam tv
Published On

तळोदा (नंदुरबार) : तळोदा- शहादा प्रवासासाठी टॅक्सी चालकांकडून ज्यादाची भाडे आकारणी करण्यात येत होती. याबाबत प्रवाशांनी आमदार राजेश पाडवी यांच्याकडे टॅक्सीमध्ये योग्य भाडे आकारणी व क्षमतेएवढे प्रवासी वाहतूक करावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली होती. त्यांवर टॅक्सीचालक- मालक संघटनेजवळ आमदारांनी चर्चा केली. त्यानंतर (Shahada) शहादा- तळोदा टॅक्सी प्रवास तिकीट प्रत्येकी ६० रुपये करण्यात आले आहे. (nandurbar news Shahada Taloda taxi fare also fixed Restrictions on unreasonable rent)

private taxi rent
Raigad Corona Update: एकाच शाळेतील 17 जण कोरोना पॉझिटिव्ह

तळोदा (Taloda) येथील शासकीय कर्मचारी, व्यावसायिक व प्रवासी नियमितपणे शहादा- तळोदा व तळोदा- शहादा असा प्रवास करीत असतात. त्यासाठी प्रवाशी साधारणतः टॅक्सी अथवा बसचा वापर करतात. दरम्यान, राज्य परिवहन मंडळाच्या बस बंद (St Strike) असल्याने प्रवासी मोठ्या प्रमाणावर टॅक्सीचा वापर करीत आहेत. त्याच्याच फायदा घेत टॅक्सीचालक टॅक्सीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवीत होते व सायंकाळी भाडे वाढवून शंभर रुपये करीत होते. दरम्यान, परिवहन महामंडळाच्या बसचे भाडे ४५ रुपये आहे. दरम्यान, दैनंदिन प्रवास करणाऱ्यांमध्ये बहुतेक प्रवासी अत्यावश्यक सेवेमध्ये कार्यरत असून गोरगरीब, कष्टकरी जनता, विद्यार्थी, तसेच वैद्यकीय कामकाजासाठी तळोदा येथून शहादा जाणाऱ्या रुग्णांचादेखील समावेश आहे.

आमदारांनी चर्चेतून काढला मार्ग

दरम्यान, टॅक्सीमधील जास्तीची भाडे (Private Taxi Rent) आकारणीबाबत प्रवाशांनी आमदार राजेश पाडवी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे तक्रार केली होती. आमदार राजेश पाडवी (Rajesh Padvi) यांनी तळोदा व शहादा येथील टॅक्सीचालक- मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आणि त्यात शहादा- तळोदा प्रवासी तिकीट प्रत्येकी ६० रुपये आकारण्याचे निश्चित करण्यात आले. टॅक्सीभाडे कमी करण्यात आल्याने प्रवाशांकडून आमदार राजेश पाडवींचे कौतुक करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com