Crime
Crime saam tv
महाराष्ट्र

Crime: नव्‍या घरात सुरू होता उद्योग; दारू कारखाना उद्‌ध्‍वस्‍त करत चौघांना अटक

संजय महाजन

जळगाव : धरणगाव शहरात नव्या घरात बनावट देशी दारू तयार करण्याचा कारखाना उभारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बनावट दारू निर्मितीच्या कारखान्यावर जळगाव (Jalgaon) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (State Excise Department) पथकाने कारवाई करुन कारखाना उद्ध्वस्त केला आहे. या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली असून दारू निर्मितीच्या साहित्यासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (jalgaon news crime news Four arrested for setting up fake liquor factory)

धरणगाव (Dharangaon) शहरातील साई गजानन पार्कमधील एका घरामध्ये बनावट देशी दारू तयार करून त्याची जिल्ह्यात विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सीमा झावरे यांना मिळाली. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथकाचे निरीक्षक सी. एच. पाटील, दुय्यम निरीक्षक एस. एफ. ठेंगडे यांच्या पथकाने खात्री करत संबंधित दारू निर्मिती केल्या जाणार्‍या घराला घेराव घालून पथकाने छापा टाकला. यावेळी दारू तयार करताना आढळून आलेल्या चार जणांना अटक करण्यात आली आहे.

११ लाखाचा मुद्देमाल जप्‍त

सदर कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने देशी मद्य तयार करण्यासाठी लागणारे स्पीरिट, देशी दारुच्या ५ हजार ११६ बाटल्या, टँगो पंचच्या ८ हजार ६०० बाटल्या, देशी मद्याचा तयार ब्लेंड, चार सिलिंग मशीन, एक ब्लेडींग मशीन, बुचे, रिकाम्या बाटल्या, खोके, कागदी लेबल व दोन दुचाकी असा एकूण ११ लाख २ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

iVOOMi Energy: एका चार्जमध्ये अख्खी मुंबई पालथी घालता येईल! जबरदस्त रेंजसह लॉन्च झाली JeetX ZE इलेक्ट्रिक स्कूटर

Numerology: 'या' तारखेला जन्मलेल्या लोकांकडून नका ठेवू निष्ठा आणि विश्वासाची अपेक्षा; काय म्हणतं अंकशास्त्र?

Apple IPad Air आणि IPad Pro भारतात लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

BCCI शी चर्चा! नको रे बाबा; कारवाईनंतर केकेआरचा गोलंदाज राणाची क्रिकेट बोर्डावर टीका

Unseasonal rain : चंद्रपूर जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा; चंद्रपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पूल गेला वाहून

SCROLL FOR NEXT