अमळनेर (जळगाव) : अमळनेर व पाचोरा तालुक्यातील काही भागाला शनिवारी (ता. २३) मध्यरात्रीपासून अचानक वादळी वाऱ्याने झोडपले. या जोरदार वाऱ्यामुळे रब्बी पिकांवर संकट कोसळले असून, यामुळे शेतकरी (Farmer) वर्ग चिंताग्रस्त झाला आहे. पहाटे वाऱ्याचा वेग जोरदार असल्याने काही भागात फुलोऱ्यावर आलेल्या रब्बी मका (Corn), ज्वारी, ऊस, दादरचे मोठे नुकसान झाले. तसेच काही ठिकाणी रब्बी दादर, ज्वारीसह मका, गहू आदी पिके जमीनदोस्त झाली आहेत. (jalgaon weather news: Gusts of wind Dadar various crops including sorghum)
रब्बीची दादर, ज्वारी काही भागात फुलोऱ्यावर आली होती; परंतु अचानक तयार झालेल्या या वादळाने मात्र बहरलेल्या मक्याला जमीनदोस्त करून टाकले. तालुक्यात खरिपाच्या हंगामातही अवकाळी पावसानेदेखील रब्बी पिकांचे मोठे नुकसान केले होते. त्यामुळे खरीप पिकांचे उत्पन्न हातात न आल्याने कुटुंबाला खाण्यासाठी का असेना रब्बीचा मोठ्या प्रमाणात तालुक्यात पेरा झाला होता.
शेतकरी हवालदिल
अचानक आलेल्या वादळाने मात्र रब्बीच्या पिकांनाही जमीन दाखविल्याने अमळनेर (Amalner) तालुक्यात दोन्ही हंगामांत उत्पन्न न आल्याने शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे. या वादळी हवेने मका, गहू आणि फळबागांचेदेखील मोठे नुकसान झाले असून, अनेक भागांत रब्बीच्या पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
तीन मंडळांत वाऱ्याचा जोर
शहरासह तालुक्यात मांडळ, मारवड, कळमसरे महसुली मंडळांत वादळी वाऱ्याचा जोर रात्रभर कायम राहिल्याने रब्बीच्या पेरण्या झालेल्या पिकांपैकी तब्बल तीन मंडळांतील गहू (Wheat), मका, रब्बी, ज्वारी, दादर पिकांना या वादळाचा फटका बसला आहे. तालुक्यातच शनिवारी रात्री अचानक वाऱ्यांच्या वेगाने हे नुकसान झाले आहे. दरम्यान, शासनाचा अधिकारी अद्याप बांधावर नाही. तालुक्यात विविध भागात शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.