Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : कापसाची परस्पर विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक; गुजरातला ट्रकमधून नेताना चालकाचा कारनामा

Jalgaon News : शेतकऱ्यांनी गुजरात येथील मढी या ठिकाणी दोन पैसे जास्त मिळतील. या आशेने एका ट्रकमध्ये कापूस भरून विकण्याचे ठरविले.

Rajesh Sonwane

पारोळा (जळगाव) : कापसाला भाव मिळत नसल्याने शेतकरी अगोदरच अडचणीत आहे. यामुळे जास्त भाव (Jalgaon) मिळेल यासाठी गुजरातच्या व्यापाऱ्यांना विक्री करण्यासाठी ट्रकमध्ये कापूस भरून रावण केला. मात्र चालकाने रस्त्यातच कापसाची (Cotton) परस्पर अर्ध्या किमतीत कापूस विक्री करून तीन शेतकऱ्यांची दहा लाखांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. (Live Marathi News)

शेवगे बुद्रूक (ता. पारोळा) येथील अशोक नध्थू पाटील, प्रल्हाद नध्थू पाटील व दिनेश एकनाथ पाटील या शेतकऱ्यांनी (Farmer) गुजरात येथील मढी या ठिकाणी दोन पैसे जास्त मिळतील. या आशेने एका ट्रकमध्ये कापूस भरून विकण्याचे ठरविले. त्यानुसार १३ जानेवारीला जळगाव येथील हसीन रशीद खानुबेगवाला यांच्या आदर्श ट्रान्स्पोर्टच्या माध्यमातून त्यांनी दहा टायर असलेला ट्रकमध्ये शेवगे बुद्रूक येथे कापूस (Cotton Price) भरण्यासाठी पाठविले होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रविवारी (१४ जानेवारी) ट्रकमध्ये १३८ क्विंटल कापूस भरल्यानंतर वाहन गुजरात राज्यात मढी येथे रवाना झाले. परंतु १५ जानेवारीला शेतकऱ्यांनी ट्रक चालकाशी संपर्क केला असता संपर्क झाला नाही. त्याने मोबाईल बंद केला होता. याबाबत शेतकऱ्यांनी ट्रान्स्पोट मालकाशी संपर्क साधला व वाहन चालकाचे नाव, परवाना याबाबत माहिती घेतली. त्यानुसार त्या क्रमांकाचा ट्रक भावनगर या ठिकाणी त्यांच्या मालकाच्या घरी उभा आहे. त्यात कुठल्याही प्रकारचा कापूस भरला नसल्याचे चौकशीनंतर ट्रान्स्पोट मालकाला कळले. या दरम्यान अज्ञात चालकाने वाटेतच ट्रकमधील १३८ क्विंटल कापूस विक्री करून रुपये नऊ लाख ९६ हजार १२० स्पये किमतीचा कापूस विकून पसार झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या पिंप्राळा येथे आषाढी एकादशीनिमित्त रथोत्सवाचे आयोजन

Raigad Politics : रायगडाच्या वादाचा दुसरा अंक; शिवसेना भाजपामध्ये सुप्त संघर्ष

Ind Vs Eng : भारताच्या ऐतिहासिक विजयात अडथळा, इंग्लंडच्या मदतीला पाऊस धावला; गिलसेना पराक्रम करणार का?

Yavatmal : बँकेतून काढलेले १ लाख रुपये लांबविले; चोरटे पोलिसांच्या ताब्यात

Monsoon Tourism: किल्ले-धबधब्यांपासून ब्रेक घ्या! पावसाळ्यात मुलांसोबत फिरण्यासाठी ‘ही’ ३ ठिकाणं बेस्ट

SCROLL FOR NEXT