Chalisgaon News Saam tv
महाराष्ट्र

दोन चिमुकल्यांसह आईचा विहिरीत आढळला मृतदेह; मृत्‍यूचे कारण अस्‍पष्‍ट

दोन चिमुकल्यांसह आईचा विहिरीत आढळला मृतदेह; मृत्‍यूचे कारण अस्‍पष्‍ट

साम टिव्ही ब्युरो

चाळीसगाव (जळगाव) : रांजणगाव शिवारातील एका विहिरीत दोन चिमुकल्यांसह आईचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी चाळीसगाव (Chalisgaon) ग्रामीण पोलिसात नोंद करण्यात आली आहे. (jalgaon news chalisgaon Mother's body found in well with two child)

शिरपूर (Shirpur) येथील मनोज पावरा हे रांजनगाव (ता. चाळीसगाव) येथे कुटुंबासह वास्तव्यास आहे. त्यांचा २०१५-१६ मध्ये मध्यप्रदेशातील खेडी गावामधील ईला हिच्‍याशी विवाह (Marriage) झाला. त्यानंतर रितेश पावरा (वय ५) व महेश पावरा (वय ११ महिने) अशी दोन मुले आहेत. घरात हलाखीची परिस्थिती असल्याने पावरा दाम्पत्य ठिकठिकाणी कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते.

रात्रीच आढळले मृतदेह

मात्र २९ जूनला रात्री साडेदहा वाजेपूर्वी रितेश व महेश पावरा या चिमुकल्यांसह पत्नी ईला मनोज पावरा (वय २५) यांचा मृतदेह (Death) एका विहिरीत आढळून आला. या घटनेने परिसरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस (Police) घटनास्थळी येत पाहणी केली. यावेळी एकाचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्‍याने मृतदेहाला विहिरीतून बाहेर काढत पती मनोज पावरा यांनी पत्नी व एक मुलाचा तपास नसल्याचे पोलिसांना सांगितले. त्यावेळी पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने अजून विहिरीच्या तळाला तपास केला. तेव्हा दोघांचेही मृतदेह मिळून आले. दरम्यान मृत्‍यूचे कारण अद्याप स्‍पष्‍ट झाले नसून वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोउनि लोकेश पवार हे करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं महागलं! १० तोळ्यामागे २४,५०० रुपयांची वाढ; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Ind Vs Nz: बॅट लोखंडाची नाहीये ना? तुफान खेळीनंतर किवींनी तपासणी अभिषेक शर्माची बॅट

Maharashtra Live News Update: कर्तव्यपथावर शौर्यदर्शन! ३० चित्ररथांचं संचालन सुरु

O Romeo : शाहिद कपूर झाला मालामाल; 'ओ रोमियो'साठी घेतलं तगडे मानधन, नाना पाटेकरांची फी किती?

Post Office Recruitment: भारतीय डाक विभागात सर्वात मोठी भरती; २८,७४० पदे भरली जाणार; पात्रता फक्त १०वी पास

SCROLL FOR NEXT