महाराष्ट्र

पूर्ण शुद्धीत लिहून देतो की..मी चाळीसगावचा समाधानी नागरिक आहे; शपथपत्र बनले चर्चेचा विषय

पूर्ण शुद्धीत लिहून देतो की..मी चाळीसगावचा समाधानी नागरिक आहे; शपथपत्र बनले चर्चेचा विषय

Rajesh Sonwane

चाळीसगाव (जळगाव) : शहरात गेल्या काही दिवसांपासून विशेषतः रस्त्यांसह इतर काही विषयांसंदर्भात निर्माण झालेल्या समस्या सध्या सोशल मीडियावर चांगल्याच गाजत आहेत. ज्यात तालुक्यातील कोणत्याही राजकीय पुढाऱ्याचे नाव न घेता, त्यांना अप्रत्यक्षरित्या शब्दरुपातून ‘चिमट्या’ही घेतल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील रहिवासी असलेल्या नागरिकाच्या नावाने लिहिलेले शपथपत्र सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे. या शपथपत्रांत कोणावरही जाहीररित्या आरोप केलेला नसला तरी ज्या कोणाला उद्देशून हे लिखाण करण्यात आले आहे त्यांना शहरवासीयाची ही भावना वाचताना खरोखरच लाज वाटत असेल, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. (jalgaon-news-chalisgaon-city-problem-satisfied-citizen-of-Chalisgaon-The-affidavit-became-later-viral-social-media)

असे आहे शपथपत्र : मी पूर्ण शुद्धीत, कुठल्याही प्रकारची नशापाणी न करता असे शपथपत्र लिहून देतो, की मी चाळीसगाव शहराचा समाधानी नागरिक असून, माझी कोणत्याही प्रशासनाबद्दल, पक्षाबद्दल, नेत्याबद्दल, कंत्राटदाराबद्दल, अधिकाऱ्याबद्दल कसलीही तक्रार नाही. पावसात पाणी तुंबते ते पाऊस पडण्यामुळेच, याची मला जाणीव आहे. रस्ते उखडतात ते बेजबाबदार वाहनचालकांमुळेच हे माझ्या लक्षात आलेले आहे. रस्त्यावर धूळ उडते ती वाहने वेगात धावण्यामुळेच हे सत्यही मला शिकविले आहे. शहरात तयार करण्यात आलेले रस्ते हे नागरिकांच्या सोयीसाठी नसून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कर्तृत्त्वाला वाव मिळावा, त्यांची उन्नती व्हावी यासाठी तयार करण्यात आले आहेत, याबाबत माझ्या मनात कसलीच शंका उरलेली नाही. या रस्त्यांचे ‘साईड मार्जीन’ हे गरजू नागरिकांनी स्वतःच स्वखर्चाने भरून घ्यायचे आहेत. संबंधित कंत्राटदारांनी त्याचेच फोटो दाखल करून ती बिले काढून घ्यायची असतात, हा नियम करण्यात आल्याचेही मला सांगण्यात आले आहे. त्याविषयी मी समाधानी आहे. हे शहर जसेही आहे ते चांगलेच आहे, त्याला चांगलेच म्हणायला पाहिजे याची शिकवण मला सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी मिळून दिलेली आहे. अशा आशयाची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लालबाग परिसरात भयंकर अपघात, २ मुलांना भरधाव वाहनानं चिरडलं; चिमुकलीचा जागीच मृत्यू

Putin -Jinping Immortal: पुतीन आणि जिनपिंग अमर होणार? चीन-रशियाच्या राष्ट्राध्यक्षांकडे कोणती जडीबुटी?

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलाकडून हेल्पलाइन नंबर जारी

Baaghi 4 Cast Fees : टायगर श्रॉफ ते श्रेयस तळपदे, 'बागी 4'साठी कोणी किती घेतलं मानधन?

Vashi Toll Accident : वाशी टोल नाक्यावर भंयकर अपघात, नवरा-बायकोचा जागीच मृत्यू, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT