Accident  Saam tv
महाराष्ट्र

कावळ्याला वाचवण्यात महिलेचा मृत्‍यू

साम टिव्ही ब्युरो

चाळीसगाव (जळगाव) : रस्त्यावर बसलेल्या कावळ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कारवरील ताबा सुटला. यामुळे कार उलटून झालेल्या अपघातात कारमधील महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना चाळीसगाव- नागद रस्त्यावरील हातले गावाजवळ घडली. याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात अपघाताची (Accident) नोंद करण्यात आली आहे. (jalgaon news chalisgaon accident news Woman dies trying to save crow)

चाळीसगाव (Chalisgaon) येथील मेडिकल व्यावसायिक तथा हनुमानवाडी भागातील रहिवासी संदीप ताराचंद बेदमुथा हे नागद येथील भावाला भेटण्यासाठी आई, पत्नी, मुलगा व मुलगी यांच्यासह कारने चाळीसगाव येथून नागद जाण्यासाठी निघाले. शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास हातले गावाजवळ वीटभट्टीसमोर रस्त्यावर कावळा बसलेला होता. संदीप बेदमुथा त्याला वाचवण्याचा प्रयत्नात असताना त्यांचा कारवरील ताबा सुटला व कार रस्त्यावर उलटली.

पत्‍नीचा मृत्‍यू

कार उलटून झालेल्‍या (Accident Death) अपघातात संदीप बेदमुथा (वय 50), कांचन संदीप बेदमुथा (47), सायराबाई ताराचंद बेदमुथा (75), जागृती संदीप बेदमुथा (26) व देवेश संदीप बेदमुथा (20) हे सर्व जण सर्व गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना रुग्णालयात (Hospital) दाखल केले असता डॉक्टरांनी कांचन बेदमुथा यांना मृत घोषित केले. जखमींवर येथील साईकृष्ण हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याबाबत दीपक जैन यांनी पोलिसांत दिलेल्या माहितीवरून अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : राज्यात मतदार यादी घोटाळा? 'मतदारांची नावं वगळण्याचा कट', भाजपवर मविआचे गंभीर आरोप

Maharashtra Politics: 'उद्धव ठाकरेंकडूनच AB फॉर्म घेणार', दारात उभ्या निष्ठावंतांसाठी मुलगा सरसावला; मातोश्रीतील बैठकीतला इमोशनल मोमेंट?

Maharashtra News Live Updates: शरद पवार गटाची सोमवारी ८० उमेदवारांची यादी जाहीर होणार

Mumbai Local train : मध्य रेल्वेवर मोठा अपघात! लोकलचा डबा रुळावरून घसरला; प्रवाशांचे हाल

Eknath Shinde : CM शिंदे थोडक्यात बचावले; हेलिकॉप्टरची करावी लागली इमर्जन्सी लँडिंग, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT