St Strike: मरू पण पाऊल मागे घेणार नाही; एसटी कर्मचाऱ्यांचा पवित्रा

मरू पण पाऊल मागे घेणार नाही; एसटी कर्मचाऱ्यांचा पवित्रा
St Strike
St Strikesaam tv
Published On

नागपूर : एसटी कर्मचाऱ्यांचे सलग गेल्‍या तीन महिन्‍यांपासून संप सुरू आहे. तरी देखील एसटी कर्मचाऱ्यांच्‍या मागण्यांबाबत तोडगा नाही. यामुळे आता मेले तरी चालेल परंतु आंदोलनाची पावले मागे नाही; असा पवित्र नागपूर (Nagpur) येथे कर्मचारींनी घेतला आहे. कॅबिनेट बैठकीत नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी एसटी कर्मचारी यांचा विलगिकरनाचा मुद्दा मांडावा यासाठी निवेदन दिले. (nagpur news st strike not take a step back Sacred to ST staff)

St Strike
Nandurbar: एकाच रात्री फोडली सहा दुकाने; एक रुपयाची नाही चोरी

नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री पालकत्व घेऊन करण्याचा मुद्दा मांडावा; अशी एसटी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. गेल्या शंभर दिवसांच्यावर झाले आहेत. नागपूर विभागातील एसटी कर्मचारी संपावर (St Strike) ती आहेत पण विलगिकरणाची मागणी मात्र अद्यापही पूर्ण झालेले नाही. कोर्टामध्ये तारीख पे तारीख मिळत आहे. त्यासाठी कॅबिनेटमध्ये यावर ती चर्चा व्हावी; यासाठी आज नागपूरच्या संपूर्ण आगारातील कर्मचारी नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांना निवेदनसाठी त्यांच्या घरी पोहोचले.

मंत्र्यांच्‍या घरी मांडला ठिय्या

घरी पोहोचलेल्‍या कर्मचाऱ्यांनी (St Employee) ठिय्या मारून त्यांच्या कार्यालयासमोर बसले. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही; तोपर्यंत पाऊल मागे घेत नाहीत असा त्यांचा पवित्रा आहे. पालकमंत्री नितीन राऊत यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा व पालकत्व घेऊन कॅबिनेट बैठकीमध्ये विलगीकरण याचा मुद्दा मांडावा आणि कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. आतापर्यंत 100 लोकांनी आत्महत्या केल्‍या आहे. त्याचा दुखवटा हे कर्मचारी पाहत आहे. त्यामुळे आता तरी सरकारने लक्ष द्यावे अशी त्यांची मागणी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com