Fraud Case Saam tv
महाराष्ट्र

Fraud Case : बनावट कागदपत्रांसह कार विकली; तरुणाची ५ लाखात फसवणूक

Jalgaon News : सिडको नगरातील संदेश चंद्रकांत काजळे याचा जुन्या वाहन खरेदी- विक्रीचा व्यवसाय असून, त्याने मणियार यांना चांगली कार देण्याचे सांगितले

Rajesh Sonwane

जळगाव : स्वस्तात लक्झरी कार देण्याचे आमीष दाखवून जळगावच्या व्यावसायिक तरुणास पाच लाखात फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात नाशिकच्या फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव (Jalgaon) शहरातील गणेशवाडी परिसरात वास्तव्यास असलेला पियूष कमलकिशोर मणियार (वय २६) यास कार घ्यायची होती. यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी तपास केल्यावर नाशिक येथील सिडको नगरातील संदेश चंद्रकांत काजळे याचा जुन्या वाहन खरेदी- विक्रीचा व्यवसाय असून, त्याने मणियार यांना चांगली कार देण्याचे सांगितले. दोघांचे बोलणे झाल्यावर संदेश काजळे याने कारच्या कागदपत्रांची झेरॉक्स पाठविली. सोबत कारही दाखविली. 

कार पसंत पडल्यावर आयूष मणियारने संदेश काजळे यास पाच लाख रुपये रोख स्वरुपात देत जानेवारी २०२४ मध्ये कार घेतली. तेव्हापासून कार आयूष मणियार यांच्याजवळ होती. मात्र कारची तपासणी केल्यावर संदेश काजळे याने दिलेल्या कारचे दस्तऐवज (Fraud Case) बनावट असून, कारची नंबरप्लेटही खोटी असल्याचे निदर्शनास आले. यावरून आयुष मणियार यांनी शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक सुनील बडगुजर तपास करीत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगाव जिल्ह्यात सात धरणे तुडुंब

रोजच्या 8 सवयी ज्या डोळ्यांसाठी घातक, वेळीच घ्या काळजी, नाहीतर...

Boiled Egg Peeling: उकडलेले अंडे सोलताना तुटतेय? 'या' सोप्या ट्रिकने काही सेकंदात निघेल कवच

Typing Side Effects : कॉम्प्युटरवर तासन्‌तास टायपिंग करणं ठरू शकतं महागात, शरीराला जखडतात 'हे' ५ गंभीर आजार

Gold Price Today: सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! आज पुन्हा दर बदलले; 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे ताजे भाव पाहा

SCROLL FOR NEXT