MPSC 
महाराष्ट्र

आरोग्य भरती रद्द करा.. परीक्षा एमपीएससी मार्फत घ्या

संजय महाजन

जळगाव : राज्‍यात आरोग्‍य विभागामार्फत झालेल्‍या गट क व गट ड पदाच्‍या भरतीसाठी परीक्षा झाली. मात्र ही भरती रद्द करून सर्व परीक्षा या एमपीएससी मार्फत घेण्यात यावी अशी मागणी अमळनेर येथील एमपीएससी समन्वय समितीतर्फे करण्यात आली. तसेच विविध प्रकारच्या मागण्यांसाठी अमळनेर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्र राज्यातील आरोग्य विभागामार्फत गट-क संवर्गातील २ हजार ७२५ पदांसाठी २४ ऑक्टोबरला, तर गट-ड संवर्गातील ३ हजार ४६६ पदांसाठी ३१ ऑक्टोंबरला परीक्षा घेण्यात आली. या आधी सप्टेंबर महिन्यात दोन्ही परीक्षा परीक्षेच्या अगदी एक दिवस आधी वेळेवर पुढे ढकलण्यात आल्या. गट- क च्या परीक्षेत नर्सिंगचा पेपर फुटल्याचे एमपीएससी समन्वय समितीने समोर आणले होते. त्याची रीतसर तक्रार पुणे पोलिसात केली. नर्सिंग आणि दुपारच्या शिफ्टमधील इतर संवर्गच्या परीक्षांचे ६० प्रश्न तेच असल्यामुळे गट-क इतर संवर्गाचे पेपर फुटण्यास वाव आहे. तसेच ३१ ऑक्टोबरनस झालेला गट-ड पदांचा २ ते ४ चा पेपर फुटल्याचे एमपीएससी समन्वय समितीने जाहीर केले होते व तसे पुरावे पुणे सायबर पोलिसात देऊन तक्रार दाखल केली होती, त्यावर आता तपास सुरू आहे. तक्षशिला महाविद्यालय अमरावती येथे एका विद्यार्थिनीला २४ ऑक्टोबर रोजी गट-क च्या जागी ३१ ऑक्टोबर रोजी होणारा गट-ड चा पेपर देण्यात आला, त्यामुळे गट-ड चा पेपर परीक्षेच्या ७ दिवस आधीच फुटल्याचे निष्पन्न होते.

एसआयटी मार्फत चौकशी करा

आरोग्य भरतीतील एकंदरीत सावळा गोंधळ बघता काही मागण्या केल्‍या आहेत. यात आरोग्य विभागाची गट-क आणि गट-ड पदांची परीक्षा रद्द करण्यात येऊन या परीक्षेतील गैरप्रकारांची एसआयटीद्वारे चौकशी करण्यात यावी. तसेच यापुढे सर्व सरळसेवा गट-क आणि गट-ड परीक्षा तसेच आरोग्य भरती फक्त एमपीएससी मार्फत घेण्यात यावी. आरोग्य भरतीत गैरप्रकार करणाऱ्या अक्षम न्यासा नामक कंपनीला कायमचे काळ्या यादीत टाकून परीक्षेचे कंत्राट काढून घेण्यात यावे तसेच या परीक्षांचे कोणत्याही प्रकारचे पेमेंट न्यासाला करू नये; अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. यावेळी समितीचे जिल्हाध्यक्ष दामोदर पाटील, राहुल माळी, पवन लोहार,सागर माळी,अजय कोळी, शुभम शिरसाठ आदी उपस्थित होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed News : घरात प्रिंटरच्या माध्यमातून बनावट नोटा छपाई; पोलिसांची १४ ठिकाणी छापेमारी, एकास अटक

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळवर दाखल

Ramayana Movie : 31 वर्षांनंतर पुन्हा येणार 'रामायण' थिएटरमध्ये, 'या' चार भाषांमध्ये होणार प्रदर्शित

Rashmika Mandanna: श्रीवल्लीचा स्टनिंग लूक; ब्लॅक आऊटफिटमध्ये केला कहर

5 Laws for Woman : प्रत्येक महिलेला 'हे' ५ कायदे माहीत असलेच पाहिजेत

SCROLL FOR NEXT