Jalgaon Crime
Jalgaon Crime Saam tv
महाराष्ट्र

अपघाताचा बनाव करत उद्योजकाला लुटले

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : उद्योजकाच्या धावत्या कारचा पाठलाग करून मागून धडक देत अपघाताचा बनाव करण्यात आला. अपघातानंतर मदतीसाठी याचकाचा बनाव करून नंतर चक्क कारमधील उद्योजकाला चाकू लावून मारहाण (Crime) करत रोख रक्कम आणि मोबाईल हिसकावून चोरटे पसार झाल्याची घटना घडली. रात्री दहा वाजेच्या सुमारास एमआयडीसी परिसरात घडलेल्या या घटनेप्रकरणी रॉबरीचा गुन्हा (Jalgaon) दाखल करण्यात आला आहे. (Jalgaon News Road Robbery)

अमित बद्रीप्रसाद अग्रवाल यांचा एमआयडीसी परिसरात विनायक ऑईल कार्पोरेशन नावाचा सोया रिफाईंड तेलाच्या होलसेल विक्रीचा उद्योग आहे. नेहमी प्रमाणे ते शनिवार रात्री दहा वाजता वडील व कारचालकासह घराकडे येण्यासाठी निघाले होते. त्यांच्यासोबत दिवसभराच्या तेल विक्रीचे 2 लाख 49 हजार 800 रुपयांची रोकड होती. वाटेत विद्युत मंडळाच्या सब स्टेशनजवळ एका दुचाकीने त्यांच्या कारला मागून धडक दिली. अपघात झाला म्हणून मदतीच्या उद्देशाने कुणाला काही लागले आहे का हे बघण्यासाठी अमित अग्रवाल हे खाली उतरले. त्यावेळी बाजुला एक मोटार सायकल पडलेली असल्याचे त्यांना दिसले. त्या मोटार सायकलजवळ तिन होते. या तिघांपैकी दोन त्यांच्याजवळ आले. आम्हाला खूप लागले आहे. असे सांगत उपचाराला पैसे मागू लागले. मात्र, आपण उपचार करवुन देतो असे सांगत रोख पैसे देण्यास त्यांनी नकार दिला.

क्षणार्धात काढला चाकू

मात्र पुढच्याच क्षणी त्यातील एकाने अमित अग्रवाल यांची कॉलर पकडून त्यांना त्याना चाकू लावला. या घटनेत अग्रवाल यांची सोडवणूक करण्यासाठी त्यांचा कारचालक रामेश्वर घुले पुढे आला. म्हणुन त्याने अग्रवाल यांना सोडत कार चालकाच्या गळ्याला चाकू लावत जीवे मारण्याची धमकी देत त्याचा मोबाईल हिसकावून घेतला. याचवेळी त्याठिकाणी दुस-या मोटार सायकलवर तिन जण आले. कारमधील रोख रकमेची पिशवी हिसकावून त्यांनी पळ काढला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : धनुष्याला मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत, कोल्हापुरातील सभेतून एकनाथ शिंदेंचा मविआवर निशाणा

Pravin Darekar On Onion News | कांदा निर्यातीवर प्रवीण दरेकरांची EXCLUSIVE प्रतिक्रिया

Priyanka Gandhi News | देशात मोठी बेरोजगारी आहे, प्रियंका गांधींचा सरकारवर हल्लाबोल

Mumbai - Pune Highway Bus Fire News | मुंबई - पुणे महामार्गावर बसला भीषण आग

Pravin Darekar On Ujjwal Nikam | भाजपकडून निकम यांना उमेदवारी, दरेकरांची EXCLUSIVE प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT