Cyber Crime: पोलिस आयुक्‍तांच्‍या नावाने अधिकाऱ्याकडूनच उकळले पैसे

पोलिस आयुक्‍तांच्‍या नावाने अधिकाऱ्याकडूनच उकळले पैसे
Cyber Crime
Cyber CrimeSaam tv

पिंपरी : सायबर हॅकरणे काही पोलीस अधिकाऱ्याकडून बेकायदेशररित्या पैसे उकळण्यासाठी चक्क पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्‍या नावाचा वापर केला आहे. सोशल मिडीयावर (Social Media) खाते ओपन करून त्‍यावर पोलिस आयुक्‍तांचा फोटो वापरला आहे. (Pune Pimpri News Cyber Crime)

Cyber Crime
Dhule: महिलेच्‍या गळ्यातून मंगळसूत्र तोडून पसार; चोरटा पोलिसांच्‍या ताब्‍यात

पिंपरी– चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या नावाने सोशल मीडियावर फेक अकाउंट तयार केले. त्या अकाउंटच्या माध्यमातून त्यांच्याच पोलीस अधिकाऱ्याकडे बेकायदेशीर रित्या गिफ्ट कार्डसाठी पैसे मागणाऱ्या (Cyber Crime) अज्ञात आरोपी विरोधात चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर तयार करण्यात आलेल्या अकाउंटमध्ये (Police) पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांचा फोटो वापरून एक मोबाईल नंबर देण्यात आला आहे. त्या नंबरवर आरोपीने पिंपरी चिंचवडचे काही पोलीस स्टेशनमधील पोलीस निरीक्षकांना गिफ्ट कार्डसाठी पैसे मागितले आहेत.

मोबाईल क्रमांक तामिळनाडूतील व्‍यक्‍तीचा

पोलीस आयुक्तांच्या नावाने तयार करण्यात आलेला फेक अकाउंटवरील मोबाईल नंबर हा तामिळनाडूतील संजय कुमार या नावाच्या व्यक्तीच्या नावाने दाखवत आहे. या प्रकरणात आता चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चिंचवड पोलीस आणि सायबर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com