Jalgaon Crime Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Crime: भिंतीला भगदाड पाडून कंपनीत चोरी; वस्तूंसह सीसीटीव्हीही नेला चोरून 

Jalgaon News : शनिवार साप्ताहिक सुटीचा दिवस असल्याने कंपन्या बंद असतात. या दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या संरक्षण भिंतीला भगदाड पाडून आत प्रवेश केला.

Rajesh Sonwane

जळगाव : जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील वैष्णवी इलेक्ट्रीकल्स या कंपनीची संरक्षण भिंतीला (Jalgaon) भगदाड पाडून कंपनीतील मौल्यवान वस्तूंसह एकूण ८४ हजार ६०० रुपयांचे साहित्य चोरट्यांनी लंपास केले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात (Police) गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. (Maharashtra News)

जळगाव शहरातील सिंधी कॉलनीत धीरज अशोक गुंडीवाल (वय ३६) कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. त्यांची एमआयडीसी परिसरात डी-सेक्टर येथे वैष्णवी इंटरप्रायजेस नावाने कंपनी आहे. दरम्यान शनिवार साप्ताहिक सुटीचा दिवस असल्याने कंपन्या बंद असतात. या दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात (Theft) चोरट्यांनी कंपनीच्या संरक्षण भिंतीला भगदाड पाडून आत प्रवेश केला. कंपनीतील ७० किलो वजनाचे कॉपर वायरचे तुकडे, पॉलीकॅब कंपनीचे बारा सिलींग फॅन,सपी प्लस कंपनीचे डीव्हीआर, २ सिसीटीव्ही कॅमेरे, असा जवळपास ८४ हजार रुपयांचे साहित्य चोरट्यांनी लंपास केले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

धीरज गुंडीवाल ८ जानेवारीला कंपनीत आल्यावर चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरट्यांनी भिंतीला भगदाड पाडून आल्याचे निदर्शनास आले. चोरटे आत शिरल्यावर त्यांना घेवुन जाण्यासारखे काहीच सापडत नसल्याने त्यांनी ७० किलो तांब्याच्या तारांचे तुकडे चोरुन नेले. चोरी करताना त्यांचे सीसीटिव्हीत चित्रण झाल्याचे त्यांना शंका आल्याने या चोरट्यांनी दोन सीसीटिव्ही कॅमेरांसह डीव्हीआर चोरुन नेला आहे. एमआयडीसी पोलिसांत या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून सहाय्यक फौजदार विजय पाटील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT