Bribe Trap Saam tv
महाराष्ट्र

Bribe Trap: मीटर बदलून देण्यासाठी मागितली लाच; वरिष्ठ तंत्रज्ञ एसीबीच्या ताब्यात

Jalgaon News : मीटर बदलून देण्यासाठी मागितली लाच; वरिष्ठ तंत्रज्ञ एसीबीच्या ताब्यात

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : घराला लावलेले वीजमीटर नादुरुस्त असल्याने ते काढून नवीन मीटर बसविण्यासाठी महावितरणच्या (Jalgaon) ग्राहकाने तक्रार दिली होती. मीटर बदलवून देण्यासाठी २५ हजारांची लाच घेणाऱ्या महावितरणच्या (Mahavitaran) वरिष्ठ तंत्रज्ञाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (Tajya Batmya)

जळगाव शहरातील आदर्शनगर परिसरातील कार्यालयात कार्यरत वायरमन संतोष भागवत प्रजापती असे लाचखोर वायरमनचे नाव आहे. तक्रारदार यांच्या घरी त्यांच्या आईच्या नावाने महावितरणचे वीजमीटर आहे. त्यांचे जुनेमीटर नादुरूस्त असल्याने नवीन वीजमीटर बसविण्यासाठी तक्रारदार यांनी श्री. प्रजापती यांच्याशी संपर्क साधला. यावेळी मीटर बदलवून देण्याच्या मागणीसाठी प्रजापती याने तक्रारदाराला २५ हजार रुपयाच्या (Bribe) लाचेची मागणी केली.

तक्रारदाराने याबाबत जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार केली. तक्रारीची उपअधीक्षक सुहास देशमुख यांनी खातर जमा करत सापळा रचत श्री. प्रजापती यांना तक्रारदारकडून २५ हजारांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडत अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

Makeup Side Effects: दररोज मेकअप केल्याने चेहऱ्यावर काय परिणाम होतो?

Maharashtra Politics : अजित पवार मला टॉर्चर करतात, शिंदेंचा गंभीर आरोप

Maharashtra Politics : रोहित पवारांची वृत्ती औरंगाजेबासारखी, मला अजित पवारांच्या मुलांची चिंता; गोपीचंद पडळकर असे का म्हणाले?

SCROLL FOR NEXT