Bribe Case Saam tv
महाराष्ट्र

Bribe Case : नवीन वीज मीटर बसविण्यासाठी मागितली लाच; वरिष्ठ तंत्रज्ञ एसीबीच्या ताब्यात

Jalgaon News : डिमांड नोट देखील भरली होती. दरम्यान तक्रारदार यांनी वायरमन अमीन शहा यांना वीज मीटर कधी बसवणार; याबाबत विचारणा केली

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : महावितरणकडून नवीन वीज कनेक्शनसाठी अर्ज केला. मात्र वीज मीटर लवकर बसवून देण्यासाठी महावितरणच्या (varangaon) वरणगाव शहरातील वरिष्ठ तंत्रज्ञाने लाचेची मागणी केली. या प्रकरणात १ हजार रुपयांची (Bribe) लाच स्वीकारताना जळगाव एसीबीने ताब्यात घेतले आहे. (Breaking Marathi News)

वरणगाव (ता, भुसावळ) येथील अमीन शहा करामत शहा (वय ३३) असे लाचखोर वरिष्ठ तंत्रज्ञाचे नाव आहे. वरणगाव शहरातीलच तक्रारदार यांच्या घराला नवीन वीज मीटर बसवण्यासाठी त्यांनी वीज कंपनीकडे (Mahavitaran) ऑनलाईन अर्ज केला होता. यासाठीची डिमांड नोट देखील भरली होती. दरम्यान तक्रारदार यांनी वायरमन अमीन शहा यांना वीज मीटर कधी बसवणार; याबाबत विचारणा केली असता शहा यांनी दोन हजार रुपयांची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने (Jalgaon ACB) जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान १२ मार्चला एसीबीने सापळा रचला. मात्र तक्रारदाराचे हावभाव पाहून वायरमन अमीन शहा यांना संशय आला व त्यांनी तक्रारदाराकडील व्हाईस रेकॉर्डर काढून त्याची मोडतोड केली. मात्र तत्पूर्वी त्यात एक हजार रुपये लाच मागणी केली असल्याचे स्पष्ट झाले. एसीबीने लागलीच लाच मागणी केल्याप्रकरणी संशयिताला अटक करत वरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT