Fraud Vaccinated Certificate saam tv
महाराष्ट्र

Fraud Vaccinated: लस न घेता ऑनलाइन नोंद करत ४५ जणांनी घेतले प्रमाणपत्र; बोदवड येथील प्रकार

लस न घेता ऑनलाइन नोंद करत ४५ जणांनी घेतले प्रमाणपत्र; बोदवड येथील प्रकार

साम टिव्ही ब्युरो

बोदवड (जळगाव) : शासकीय ऑनलाइन आकडेवारीमध्ये शहरातील ४५ जणांनी लस घेतल्याचे बोगस प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बोगस प्रमाणपत्र घेतलेल्‍यांविरुद्ध बोदवड पोलिस (Bodwad Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (jalgaon news Bodwad city Certificates taken by 45 people who registered online without getting vaccinated)

ऐनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी कपिल पवार यांनी पथकासह बोदवड (Bodwad) शहरातील दत्त कॉलनी, उर्दू शाळा परिसर या भागात लसीकरण (Covid Vaccination) मोहीम राबवली. अवघ्या दोन तासात त्यांनी ९८ जणांचे लसीकरण केले. ही नोंद रीतसर शासकीय ऑनलाइन रजिस्टरसुद्धा केली होती. परंतु नंतर त्यांनी रजिस्टर ऑनलाइन आकडेवारी पाहिली असता लसीकरण तब्बल १४४ नागरिकांचे झाले असल्याचे दिसून आले. यावरून त्यांनी आरोग्य सेविकांच्या रजिस्टरमधील नोंदी तपासले असता ९८ नागरिकांनी लस घेतल्याची नोंद आढळली. यामुळे ऑनलाइन रजिस्ट्रेशन ४५ नावे लसीकरण न करताच वाढलेली दिसून आली.

राजकिय पुढाऱ्याच्‍या दबावाखाली नोंदी झाल्‍याची चर्चा

डेटा ऑपरेटरशी याबाबत चर्चा केली असता सदर लसीकरणाची नोंद करणारे पोर्टल हे अज्ञाताने हॅक करीत या नोंदी करण्याचे सांगण्यात आले. यावरून ऐनगाव आरोग्य अधिकारी कपिल पवार यांनी त्या ४५ नागरिकांविरुद्ध बोदवड पोलिस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला. या उलट शहरात राजकिय मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीच्या दबावाखाली येऊन पैशांची देवाणघेवाण करून सदर लसीकरण करणारे कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचाऱ्यांनी आधार कार्डाच्या साह्याने ऑनलाइन बोगस नोंद (Fraud Vaccinated Certificates) केली असल्याची चर्चा शहरात पसरली आहे. तरी प्रशासनाने या ४५ लस न घेता प्रमाणपत्र मिळवणाऱ्या नागरिकांची कसून चौकशी करून सत्य समोर आणावे.

बोगस प्रमाणपत्र घेतलेले

शेख वसीम शेख शफी बागवान, इशरत मुख्तार बागवान, सुफियांना शेख सिकंदर पिंजारी, शबुग्ता परविन अब्दुल रहेमान बागवान, शेख मोहसीन शेख रफिक, पुनम रविंद्र सोनवणे, शाहीन बी शेख आसीफ, रुबीनाबी सई हारुण बागवान, नसरीन शे नाजीम पिंजारी, हाज्जाबी शेख अब्दुला बागवान, शेख इमरान शेख रफिक मण्यार, मंदा श्रावण भोई, सायदा बी असलम बागवान, नाजेमा परविण जावेद सैय्यद, शहारुख रफिक शेख, सायेमा वसीम बागवान, मुसकान बी वसीम बागवान, सोफिया बी शेख रफिक, सुभाष गजानन मोरे, शबाना इक्बाल बागवान, शोयब अहेमद शेख अय्युब, रीजमीन कौसार जाबीर खा, नुरसत परवीन शेख बागवान, प्रवीण अनिल उगले, इक्बाल अब्दुल सत्तार बागवान, शेख हरुण शेख हसन, शेख असीफुद्दीन अल्लाउद्दीन, सैय्यद अस्लम सैय्यद रशीद बागवान, प्रमोद प्रकाश जवरे, फातेमा मुख्तार बागवान, रुक्सार परवीन गुफरान अहेमद, खातुस्बी शेख हामीद मन्सार, वसीम रऊफ बागवान, शेख लतीफ शेख शफी, फराना अंजुम शेख लतीफ बागवान, शेख मुक्तर अब्दुल सत्तर बागवान, गुफराण अहमद शेख अब्दुल्लाह, शेख आसिफ शेख इब्राहिम बागवान, अकिया निसार बागवान, कारले शंकर रामकृष्ण, अमद शेख रसुला मण्यार, रविंद्र सोमा सोनवणे, बागवान सय्यद हरून सय्यद रशीद, शेख फिरोज शेख रफिक मण्यार, अनोळखी एक.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

Bullet Train Bridge Collapsed: बुलेट ट्रेन प्रकल्पाचा निर्माणाधीन पूल कोसळला; अनेक कामगार मलब्याखाली दबले

Assembly Election: मनोज जरांगे पाटलांनी रयतेतल्या मराठ्यांचा बळी दिला: प्रकाश आंबेडकर

SCROLL FOR NEXT