भाजप 
महाराष्ट्र

ओबीसींच्या न्याय– हक्कासाठी मोर्चा; जामनेरात भाजपचे आंदोलन

ओबीसींच्या न्याय– हक्कासाठी मोर्चा; जामनेरात भाजपचे आंदोलन

संजय महाजन

जळगाव : ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला असून आज जामनेरमध्‍ये भाजपने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत जोरदार निदर्शने केली. कार्यकर्त्यांनी आरक्षणाची मागणी करीत ठाकरे सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच ओबीसींच्या हक्कासाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. (jalgaon-news-BJP's-agitation-in-Jamner-obc-reservation-issue)

ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द करून तसेच त्यांच्या हक्कासाठी व न्यायासाठी कोणत्याही प्रकारची प्रशासकीय रचना न करता पाच जिल्हा परिषदेच्या निवडणुका या महाराष्ट्र सरकारने जाहीर केल्या. हा एक प्रकारे ओबीसींच्या प्रशासकीय हक्कांवर गदा आणण्यासारखे आहे. या अन्याया विरोधामध्ये भारतीय जनता पक्ष ओबीसींच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे. या संदर्भात आज तहसीलदार अरूण शेवाळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

न्याय व हक्कासाठी मोर्चा

भाजपा कार्यालयापासून जामनेर तहसीलपर्यंत ओबीसींच्या न्याय व हक्कासाठी मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व जामनेर तालुकाध्‍यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी केले असून यावेळी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण अबाधित राहावे यासाठी भारतीय जनता पार्टी ओबीसींच्या पाठीशी आहे. जो पर्यंत ओबीसींना आरक्षण मिळत नाही तोवर आंदोलन सुरूच राहणार असल्‍याचा पवित्रा भाजपने घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi Metro Job: दिल्ली मेट्रोत मॅनेजर होण्याची संधी; महिना ८७००० रुपये पगार, पात्रता काय? जाणून घ्या

Ice cream ला संस्कृतमध्ये काय म्हणतात? तुम्हाला माहितेय का?

Viral Video: हे प्रभु ! एक्सीलेटरवरुन येण्याची नवीन पद्दत, VIDEO पाहून पोट धरुन हसाल

Viral Video: नातवासाठी काहीपण! चिमुकल्याला हसवण्यासाठी आजोबांचा डान्स; पाहा VIDEO

Maharashtra News Live Updates: बुलडाण्यात पोलिस व्हॅन आणि पिकअपची समोरासमोर धडक, २ पोलिसांसह तिघे गंभीर

SCROLL FOR NEXT