ओबीसी आरक्षण..लातुरात विविध ठिकाणी भाजपाचे आंदोलन

ओबीसी आरक्षण..लातुरात विविध ठिकाणी भाजपाचे आंदोलन
ओबीसी आरक्षण
ओबीसी आरक्षण
Published On

लातुर : राज्यात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण रद्द झाल्याने आज राज्यभरात भारतीय जनता पक्षाच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहे. यनुसार लातूर शहरासह जिल्ह्यातील औसा, निलंगा, चाकूर, उदगीर, अहमदपूर, रेणापूर, देवणी यासह अन्य ठिकाणी आंदोलन करण्यात आले आहे. (latur-news-OBC-reservation-BJP's-agitation-in-various-places-in-Latur)

औसा इथे भाजपा आमदार अभिमन्यू पवार तर लातूर इथे आमदार रमेशप्पा कराड, निलंगा येथे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय तर तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले आहे. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात योग्य भूमिका मांडू न शकल्याने ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे.

ओबीसी आरक्षण
आजपासून टोल वसुली; काम अपुर्ण असल्‍याचे सांगत राष्‍ट्रवादीचा विरोध

सरकार करतेय टाळाटाळ

महाविकास आघाडी सरकारने इंपेरिकल डेटा गोळा करण्यासाठी मागासवर्गीय आयोग नेमला; पण त्यास अद्यापही निधी उपलब्ध करून दिली नसल्याने डेटा जमा करता आला नाही. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सरकारने गेल्या सहा महिन्यांपासून टाळाटाळ करत असल्याने ५ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यामुळे ओबीसी समाजावर अन्याय झाला आहे जोपर्यंत ओबीसीना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका अशी मागणी आंदोलक आमदार अभिमन्यू पवार यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com