Central railway 
महाराष्ट्र

मध्‍य रेल्वेचा पंधरा वर्षातील नवा रेकॉर्ड; भंगार विक्रीतून कमावले इतके कोटी

‘झीरो स्क्रॅप’ मिशन..मध्‍य रेल्वेचा पंधरा वर्षातील नवा रेकॉर्ड; भंगार विक्रीतून कमावले इतके कोटी

साम टिव्ही ब्युरो

भुसावळ (जळगाव) : वर्षभरापासून कोरोना संकटामुळे रेल्वेची देशभरातील प्रवासी वाहतूक जवळपास ठप्प असल्यात जमा होती. त्यामुळे रेल्वेला प्रवासी वाहतुकीसाठी मिळणारे मोठे उत्पन्न बुडाले आहे. मात्र, याच काळात रेल्वेने भंगारात काढलेल्या वस्तूंची विक्री करून मोठे उत्पन्न मिळवले आहे. मध्य रेल्वेने २०२०-२१ या वर्षात भंगार विक्रीतून ३९१ कोटी ४३ लाख रुपये कमावले आहेत. १५ वर्षांत भंगार विक्रीतून झालेली ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कमाई आहे. (jalgaon-news-bhusawal-Zero-scrap-mission-Central-Railway-in-fifteen-years-So-many-crores-earned-from-scrap-sales)

मध्य रेल्वेमधील प्रत्येक विभाग, कार्यशाळा आणि शेड भंगार साहित्यापासून मुक्त करण्यासाठी मध्य रेल्वेने ‘झीरो स्क्रॅप मिशन’ सुरू केले आहे. रेल्वेकडून भंगारात काढण्यात आलेल्या वस्तूंमध्ये जुने रुळ, साचे, जुनी इंजिन, त्यांचे डबे अशा बाबींचा समावेश आहे.

पंधरा वर्षातील सर्वाधिक स्‍क्रॅप

सध्या अनेक मार्गांवर रेल्वेकडून विजेची कामे सुरू आहेत. त्यामुळे जुन्या इंजिनांमध्ये बदल करावे लागतात. या प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणावर भंगार निघते. भंगार विक्रीचा व्यवहार पारदर्शक ठेवण्यासाठी ही लिलाव प्रक्रिया ऑनलाइन झाली. कोविड-१९ महामारी असूनही मध्य रेल्वेने २०२०-२१ या वर्षात ३५० कोटींचे स्क्रॅप विक्रीचे लक्ष्य ओलांडले आणि ३९१ कोटी ४३ लाख रुपयांचे स्क्रॅप विकले आहे, जे गेल्या १५ वर्षांतील सर्वाधिक आहे. रेल्वे विभागाने २०२१-२२ या आर्थिक वर्षात भंगार विक्रीतून ४०० कोटी रुपये इतके उत्पन्न मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

भंगार विक्रीतून महसूल वाढ

मध्य रेल्वेने आठ कोटी ६५ लाख रुपयांच्या कमाईसह ई-ऑक्शनद्वारे ‘जसे आहे तिथे आहे’ या तत्त्वावर वापरात नसलेल्या संरचनांची विल्हेवाट लावली आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी म्हणाले, की भंगार विक्री केवळ महसूल निर्माण करण्यातच मदत करत नाही, तर यामुळे परिसराची देखरेख चांगल्या प्रकारे होते. ते म्हणाले, की रेल्वेतील विविध ठिकाणी असलेले व निवडण्यात आलेले सर्व भंगार साहित्य विकण्यासाठी मध्य रेल्वे मिशन मोडमध्ये काम करेल. या आर्थिक वर्षात रेल्वे लाभार्थ्यांच्या उपचारासाठी ऑक्सिजन जनरेटर प्लांटसह कोविड वस्तूंच्या खरेदीची व्यवस्था करण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल

वाहनाचे इंजिन ऑइल खराब झाले हे कसं ओळखायचं? ही १ गोष्ट लक्षात ठेवा

Fort History : २६ वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी, मुघलही थकले, पण जिंकू शकले नाहीत हा अभेद्य किल्ला

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

SCROLL FOR NEXT