Railway Bhusawal News Saam tv
महाराष्ट्र

Bhusawal News: रेल्‍वेने विना तिकिट प्रवास; एकाच दिवसात १७ लाखाचा दंड वसूल

रेल्‍वेने विना तिकिट प्रवास; एकाच दिवसात १७ लाखाचा दंड वसूल

साम टिव्ही ब्युरो

भुसावळ (जळगाव) : भुसावळ रेल्वे विभागाने तिकीट तपासणी‎ मोहिमेत एका दिवसात १७ लाख ३० हजार रूपये‎ दंड वसूल केला.‎ विभागीय (Railway) रेल्वे व्यवस्थापक एस. एस. केडिया‎ यांच्या नेतृत्वात (Bhusawal) आणि मुख्य विभागीय वाणिज्य‎ व्यवस्थापक शिवराज मानसपुरे यांच्या‎ मार्गदर्शनाखाली सदर मोहिम राबविली. (Tajya Batmya)

नाशिक, मनमाड, जळगाव, भुसावळ,‎ खंडवा, अकोला, बडनेरा या स्थानकांवरही‎ तपासणी करण्यात आली. सेंट्रल रेल्वेची ही‎ मोहीम यशस्वी करण्यासाठी ३ अधिकारी, व‎ तिकीट चेकिंग स्टाफ, वाणिज्य स्टाफ व‎ आरपीएफ स्टाफ अशा एकूण ४२ टीम तयार‎ करण्यात आल्या होत्या.‎ या टीमने सखोल तपासणी करून ३ हजार २२‎ केसेसद्वारे एकूण १७ लाख ३० हजार वसूल केले‎ गेले. प्रवाशांनी प्रवास करताना योग्य ते तिकीट‎ घ्यावे व ज्या क्लासचे तिकीट आहे. त्या‎ क्लासमध्ये प्रवास करावा असे आवाहन सेंट्रल‎ रेल्वेने केले आहे. लाईनमध्ये उभे न राहता‎ तिकीट हवे असेल तर प्रवाशांनी युटीएस ॲपचा‎ वापर करावा असे रेल्वे प्रशासनाने कळवले‎ आहे.‎

७० गाड्यांची तपासणी

सेंट्रल रेल्वेच्या भुसावळ‎ विभागात वाणिज्य विभाग व आरपीएफ विभाग‎ यांच्या विद्यमाने १४ मार्चला खंडवा ते‎ इगतपुरी, अमरावती ते भुसावळ, (Chalisgaon) चाळीसगाव-‎ धुळे; जलंब- खामगाव विभागाची एक दिवसीय‎ तिकीट तपासणी मोहीम राबवली.‎ वाणिज्य निरीक्षक, तिकीट तपासनीस आणि‎ आरपीएफ जवान यांचे संयुक्त पथक तयार‎ करून सुमारे ७० गाड्यांची तपासणी करण्यात‎ आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ४५ लाख लाडक्या बहि‍णींचे ₹१५०० कायमचे बंद; २६ लाख महिलांवर अपात्रतेची टांगती तलवार

Maharashtra Live News Update: स्थानिक भाषा टिकवण्यासाठी परराज्यांचे धोरण काय?,मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा सवाल

Ladki Bahin Yojana: रखडलेल्या हप्त्यासाठी महिलांचा राडा; लाडकींचे पैसे नेमके गेले कुठे?

एका सेल्फीवर EPF चं खातं उघडता येणार; जाणून घ्या प्रोसेस स्टेप बाय स्टेप

Russia vs Ukraine war : रशिया-युक्रेन युद्ध पुन्हा पेटलं; युक्रेनचे लष्करी तळ उद्धवस्त, VIDEO

SCROLL FOR NEXT