Nashik News: उपचाराअभावी वृद्धाचा मृत्‍यू; रुग्णालया बाहेर मृतदेह पडून, कर्मचारी संपाचा परिणाम

उपचाराअभावी वृद्धाचा मृत्‍यू; रुग्णालया बाहेर मृतदेह पडून, कर्मचारी संपाचा परिणाम
Nashik Civil Hospital
Nashik Civil HospitalSaam tv
Published On

तबरेज शेख

नाशिक : राज्य कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा परिणाम आता हा रुग्णसेवेवर देखील जाणवत आहे. नाशिकच्या (Nashik News) जिल्हा रुग्णालयाच्या अगदी गेट बाहेर एका बेवारस वृद्ध व्यक्तीचा उपचाराभावी मृत्यू झाल्याचे धक्कादायक चित्र दिसून येत आहे. शरमेची बाब म्हणजे रात्रभर झालेल्या पावसात हा व्यक्ती उपचारासाठी तडफडत मरण पावल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले आहे. (Live Marathi News)

Nashik Civil Hospital
Dhule News: वीज पडून गाईचा मृत्यू; अवकाळी पाऊस सुरूच

मानव जातीला काळिमा फासणारा हा प्रकार असल्‍याचे म्हणावे लागेल. स्‍थानिकांनी याबाबत पोलिसांना आणि काही फुटांवर असलेल्या नाशिक सिव्हील रुग्णालयाला देखील याबाबत कळवण्यात आले होते. तरी देखील कुठलाही प्रतिसाद देण्यात न आल्याचे नागरिकांनी सांगितले. माध्यम प्रतिनिधींनी जेव्हा हे वास्तव दाखवले; तेव्हा कुठे संपात सहभागी कर्मचारी यांनी सदर ठिकणी पोहोचून एकाचा मृतदेह आणि एक मृत्यूच्या दारात जाणाऱ्या व्यक्तीला उचलून नेण्यात आले.

अन्‍य एक व्यक्ती मोजतोय शेवटचा श्‍वास

रुग्णालया बाहेर एका व्‍यक्‍तीचा उपचाराअभावी मृत्‍यू झाला. एवढेच नव्हे तर याच मृतदेहापासून काही अंतरावर आणखी एक व्यक्ती गंभीर अवस्थेत शेवटचा श्वास मोजत असल्याचे धक्कादायक वास्तव दिसून येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com