जळगाव : तालुक्यातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारातून ती गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (jalgaon news Atrocities on minors minor girl shocking type of pregnancy)
जळगाव (Jalgaon) तालुक्यातील एका गावात राहाारी १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी नातेवाईकांसह वास्तव्यास आहे. ५ ते १० नोव्हेबर २०२१ दरम्यान संशयित आरोपी याने मुलीशी जवळीक साधुन दोन वेळा अत्याचार केला. या अत्याचारातून पिडीत मुलगी गर्भवती राहीली. २२ फेब्रुवारीला सकाळी पीडित मुलीच्या पोटात दुखायला लागले. तेव्हा पालकांनी तिला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (Jalgaon Medical Collage) उपचारासाठी आणले असता हा धक्कादायक प्रकार समोर आला.
पोलिसात तक्रार दाखल
पीडीत मुलीला नातेवाईकांनी विश्वासात घेवून विचारपूस केली असता आपल्यावर संशयित आरोपी याने दोन वेळा अत्याचार केल्याचे सांगितले. पीडीत मुलीच्या नातेईकांना पिडीतेसह एमआयडीसी पोलीस (Police) ठाण्यात जात रात्री तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी विरोधात पोक्सो कायद्यांर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गिरासे करीत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.