Breaking: दहावी– बारावी बोर्डाच्‍या प्रश्‍नपत्रिका जळून खाक; वाहतुक करणाऱ्या टेम्‍पोला आग

दहावी– बारावी बोर्डाच्‍या प्रश्‍नपत्रिका जळून खाक; वाहतुक करणाऱ्या टेम्‍पोला आग
fire
firesaam tv
Published On

अहमदनगर/संगमनेर : प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोला अचानक आग लागली. या आगीत संपूर्ण प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्‍या आहेत. (Ahmednagar news Tenth Twelfth Board Question Paper Burned Fire on the transport tempo)

fire
डाकू आमदाराला तीस वर्षे निवडून कसे दिले : एकनाथ खडसे

संगमनेर (Sangamner) तालुक्यातील पुणे- नाशिक महामार्गावर (Pune Nashik Highway) दहावी बारावीच्या पुणे बोर्डाच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या टेम्पोला चंदनापुरी घाटात मागच्या बाजूने आग लागली. या आगीमध्ये संपूर्ण प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनास्थळी पोलीस अग्निशामक दल (Fire Brigade) दाखल होत टेम्पो विझवण्यात आला. मात्र तोपर्यंत टेम्पो संपूर्ण जळून खाक झाला होता.

पुणे बोर्डाचे अधिकारी येणार

घटनेमध्ये जीवित हानी झाली नसली, तरी टेम्पो संपूर्ण जळून खाक झाला असून त्यामधील सर्व दहावी– बारावीच्या प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुणे (Pune) बोर्डाचे अधिकारी घटनास्थळी आल्यानंतरच पंचनामा करू अशी माहिती संगमनेर पोलिसांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com